सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 355 प्रकरणांची नोंद , उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवारी (13) रोजी शोध पथकाने 355 प्रकरणांची नोंद करून 109100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 12 प्रकरणांची नोंद करून रु 2400 रुपयांचा दंड वसुल केला. सगळयांवर प्रत्येकी रु ४०० प्रमाणे दंड लावण्यात आला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 107 प्रकरणांची नोंद करून 42800 रुपयांची वसुली करण्यात आली.कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 101 प्रकरणांची नोंद करून 10100 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 29 प्रकरणांची नोंद करून रु 11600 दंड वसूल करण्यात आला. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु.2000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करुन रु 2000 दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे (रु.1000/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करुन रु 2000 दंड वसूल करण्यात आला.

चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु.1000/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करुन रु 3000 दंड वसूल करण्यात आला. या व्यतिरिक्त इतर 81 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 16200 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. तसेच उपद्रव करणा-या संस्थांकडून 19 प्रकरणांमध्ये 19000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक  राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख  वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे  पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामात दिरंगाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला मनपा आयुक्तांनी केले बडतर्फ

Fri Oct 14 , 2022
स्वच्छता कार्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही : सतत गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही होणार कारवाई नागपूर :- स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने शहर स्वच्छेतेच्या कार्याबाबत दिरंगाई, कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी देत कामात दिरंगाई करणा-या एका सफाई कर्मचा-याला मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे. याशिवाय विना सूचना, विना अर्ज व विना परवानगीने कामावर सतत गैरहजर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com