कुही :- पोस्टे. कुही हद्दीतील पांडेगाव ते कुही रोडवरील एकवीरा नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध्य मोहफुलाचा दारूची वाहतुक होत असल्याची गोपनिय माहीती कुही पोलीसांना मिळाल्याने दिनांक ३१/०३/२०२४ रोजी पोलीस स्टेशन कुही येथिल अधिकारी व स्टाफसह वरिष्ठांना माहीती देवुन मा. दिपक अग्रवाल सा. भापोसे सहा. पोलीस अधिक्षक तथा ठाणे प्रभारी यांचे नेतृत्वात एकवीरा नगर शिवारात जावुन कुही पांडेगाव रोडवर नाकांबदी करून वाहने चेक करीत असतांना दरम्यान मो. सा. क्र. एम. एच. ३६/ए के- ८७७१ चा चालक नामे अक्षय मनोज घरडे, रा. फुलमोगरा अशोक नगर शहापूर भंडारा याला ताब्यात घेवुन याच्या ताब्यातुन दोन रबर ट्युबमध्ये प्रति ट्युब २० लिटर प्रमाणे ४० लिटर मोहाफुल गावठी दारू प्रति लिटर ५०रू, प्रमाणे २०००/- रू व वाहतुकीसाठी वापरलेले वाहन किमती ८०,०००/- रू. असा एकुण ८२,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करूण पुढील कार्यवाही करण्यात आली.
कार्यवाही पथक पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार भापोसे तसेच अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ , यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार IPS दिपक अग्रवाल, सहा. पोलीस अधिक्षक पोस्टे कुही याच्या नेतृत्वात पोउपनि स्वप्नील गोपाले, पोहवा ओमप्रकाश रेहपाडे, पो. शि. अनिल करडखेले यांनी यशस्वीपणे पुर्ण केलेली आहे.