शहरातील ३४ ठिकाणी बनणार ‘स्मार्ट पब्लिक टॉयलेट’

– मनपा आयुक्तांपुढे विस्तृत प्रकल्प अहवाल सादर

नागपूर :- नागपूर शहरात प्रशासनगृहांची आवश्यकता असलेल्या विविध ३४ ठिकाणी नागपूर महानगरपालिकेद्वारे ३४ नवीन ‘स्मार्ट पब्लिक टॉयलेट’ निर्माण करण्यात येणार आहेत. यासंदर्भात मंगळवारी (ता.१७) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यापुढे विभागाद्वारे विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला.

मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षामध्ये आयोजित बैठकीत मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता कमलेश चौहान, उपअभियंता डी.एम. भोवते, सचिन चमाटे, उपअभियंता मनोज रंगारी, पेठेवार सुलभ इंटरनॅशनलचे रामनरेश झा, वास्तुविशारद सुधाकर किणी आर्किटेक्‍ राहुल र्शमा आदी उपस्थित होते. यावेळी वास्तुविशारद सुधाकर किणी यांनी शहरात विविध भागात निर्माण होणा-या स्मार्ट पब्लिक टॉयलेटचे डिझाईन आणि सुविधांबाबत सादरीकरणातून माहिती दिली. नागपूर शहरात नवीन स्मार्ट पब्लिक टॉयलेट निर्माण करण्यासाठी आवश्यकता असलेल्या भागांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले होते. त्यानुसार बैठकीमध्ये माहिती सादर करण्यात आली. मनपाद्वारे शहरात ४४ ठिकाणचे सर्वेक्षण करून त्यातून ३४ ठिकाणे निश्चित करण्यात आली. ३४ ठिकाणांमध्ये मनपाच्या १० जागा, नासुप्रच्या २ जागा आणि २२ फुटपाथचा समावेश आहे. स्मार्ट पब्लिक टॉयलेट संदर्भात कंटेम्परी, अल्ट्रा मॉडर्न आणि हेरिटेज असे तीन प्रकारचे डिझाईन यावेळी सादर करण्यात आले. या प्रकल्पाची अंदाजित कीमत रु. 16.73 कोटी आहे.

स्मार्ट पब्लिक टॉयलेटमध्ये महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र शौचालय, स्नानगृह आणि लघुशंकेची व्यवस्था असणार आहे. याशिवाय स्तनदा मातांसाठी वातानुकूलित हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी व्हिल चेअर, महिलांसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन तसेच डिस्ट्रॉय मशीन, हँड ड्रायर, सेन्सर प्रणालीयुक्त दरवाजे, सॅनिटर पॅड वेंडिंग मशीन आणि पॅड डिस्ट्रॉय मशीन आदी सुविधा असणार आहेत. सर्व स्मार्ट पब्लिक टॉयलेटमध्ये लघुशंका नि:शुल्क असेल.

या ठिकाणी तयार होणार स्मार्ट पब्लिक टॉयलेट

एम.ए. गर्ल स्कूल जवळ झाशी राणी चौक सीताबर्डी, कॉर्नर अपार्टमेंट जवळ म्हाळगी नगर चौक, राणी दुर्गावती चौक, कळमना आरटीओ शेजारी उड्डाण पुलाजवळ, अमरावती रोड भोले पेट्रोल पम्प, गायत्री नगर नासुप्र उद्यान झिंगाबाई टाकळी, तुळशी नगर चौक जरीपटका बाजार रोड, गिट्टीखदान चौक काटोल रोड, संजय गांधी नगर उदय नगर चौक, ऑरेंज सिटी स्ट्रीट जवळ जयताळा बाजार रोड, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट शनी मंदिर रोड सीताबर्डी, उत्तर अंबाझरी रोड माटे चौक, सुपर स्पेशॅलिटी कॅन्सर हॉस्पिटल तुकडोजी पुतळा, ट्रॉन्स्पोर्ट नगर टी पॉईंट भंडारा रोड उड्डाण पूल, अवस्थी नगर चौक, पंचशील चौक कॅनल रोड, स्मशानभूमी बेसा शहर बस स्थानक मानेवाडा-बेसा रोड, परंपरा लॉन चौक जुना भंडारा रोड, दिघोरी उड्डाण पुलाखाली दिघोरी चौक, भवानी माता ट्रस्ट हॉस्पिटल समोर पारडी, सेव्हर स्टार हॉस्पिटल समोर जगनाडे चौक, मनपा ईएसआर प्रजापती चौक, नागपूर विद्यापीठ कॅम्पस चौक, नाग मंदिर समोर उमरेड रोड, केअर हॉस्पिटल जवळ हितवाद कार्यालयाच्या बाजूला, भांडेवाडी एसटीपी, कांजी हाउस चौक, मोरभवन बस स्थानक, ओंकार नगर चौक, ऑटोमोटिव्ह चौक, छत्रपती चौक, लिबर्टी टॉकीज पार्किंग सदर, आय.टी. पार्क रोड व्हीआयपीएल, व्यंकटेश नगर बाजार.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूरच्या विणकर सेवा केंद्रामार्फत 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान जिल्हा हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन

Wed Oct 18 , 2023
नागपूर :- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या विणकर सेवा केंद्रामार्फत उद्या 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे जिल्हा हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन 18 ऑक्टोबर बुधवार रोजी सायंकाळी 05.30 वाजता , महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त गोरक्ष गडलीकर, यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात हात मागाद्वारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com