सियावर रामचंद्र की जय… सुकन्या समृद्धी योजनेच्या लाभार्थ्यांना मोठं गिफ्ट; मोदी सरकारची नव वर्षातील मोठी घोषणा काय?

नवी दिल्ली :- केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या आधी देशवासियांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारने जानेवारी 2024 मध्ये काही योजनांचे व्याजदर वाढवले आहेत. तीन वर्षांच्या मुदत ठेवीसारख्या लहान बचत योजनांच्या व्याजदरामध्ये मोठी वाढ केलीये. केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) आणि तीन वर्षांच्य मुदत ठेवी योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. यामधील लहान बचत योजनांमध्ये व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेचा आणि तीन वर्षांच्या मुदत ठेवीचा व्याजदर वाढवला आहे. याआधी सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर हा 8 टक्के आहे. तर तीन वर्षांच्या टीडीचा व्याजदर हे 7.1 टक्के होते. (Public Provident Fund) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या योजनेच्या व्याजदरात दरात गेल्या तीन वर्षांपासून कोणताही बदल करण्यात आला नाही.

PPF व्याजातील शेवटचा बदल एप्रिल-जून 2020 मध्ये झाला होता. त्यावेळी या व्याजाच्या दरात घट करण्यात आली होती. हा व्याजदर 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्के करण्यात आला आहे. गेल्यावेळी केंद्र सरकारने पंचवार्षिक आरडी योजनेतही बदल केला नव्हता.

जानेवारी-मार्च 2024 चे व्याज

पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4% व्याज

एक वर्षाच्या ठेवीचा व्याज दर ६.९ टक्के

2 वर्षांच्या ठेवीचा व्याज दर 7.0 टक्के

३ वर्षांच्या ठेवींवर ७.१ टक्के व्याजदर

5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 7.5 टक्के व्याज आहे

5 वर्षांच्या आरडी योजनेवर 6.7 टक्के व्याज आहे

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) व्याज 7.7 टक्के

किसान विकास पत्र व्याज 7.5 टक्के

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) व्याज 7.1 टक्के

सुकन्या समृद्धी खात्यावर (SSY) व्याज ८.२ टक्के आहे

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSSY) व्याज 8.2 टक्के आहे

मासिक उत्पन्न खाते व्याज 7.4 टक्के

या योजनांच्या व्याजामध्ये बदल नाही

दरम्यान, जानेवारी मार्च 2024 या तिमाहीसाठी फक्त सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजात (SSY) आणि तीन वर्षांच्या मुदतींच्या ठेवीमध्ये वाढ करण्यात आली आहे. बाकी सर्व लहान बचत योजनांमध्ये कोणताही बदल केला नाही. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट या योजनेवरील व्याज हे बँक एफडीपेक्षा जास्त आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

द्वारका शारदापीठ के शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती  गुरुधाम दिघोरी सिवनी के लिए रवाना हुए 

Sun Dec 31 , 2023
नागपुर :- सुक्रवार की शाम को द्वारिका शारदा पीठाधीश्वर के जगदगुरु शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज का विमान द्धारा कोलकाता से नागपुर आगमन पर भव्य स्वागत किया गया. ब्रह्मलीन जगदगुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती के नए उत्तराधिकारी के रूप में पहली बार शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज नागपुर पधारें है. वे क्वेटा कालोनी नागपुर स्थित राजूभाई टांक के निवासगृह मे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com