संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मदन चौक खलाशी लाईन कामठी परिसरातून सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल कंटोन्मेंट बोर्ड कामठी येथे शिकणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी घेऊन जात असलेली ओमनी स्कूल व्हॅन गरुड चौक स्टेट बँक इंडिया समोरील मार्गावर उलटल्याने सहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून चालकाची प्रकृती गंभीर झाल्याची घटना सकाळी सात वाजता घडली. प्राप्त माहितीनुसार कैलास जिभकाटे वय 34 वर्ष राहणार नाका नंबर दोन भिलगाव हा एमएच 31 सीएन 3052 पांढरा रंगाच्या ओमिनी स्कूल व्हॅन मध्ये मदन चौक खलाशी लाईन परिसरातून सहा विद्यार्थी घेऊन सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल कंटोन्मेंट बोर्ड कामठी येथे सोडण्याकरिता जात असताना नागपूर -जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील गरुड
चौकातील स्टेट बँकेसमोर अनियंत्रित स्कूल व्हॅन उलटल्याने सहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून चालक कैलास जीभकाटे गंभीर जखमी झाला असून अपघात होताच नागरिकांनी धावून किरकोळ जखमी शेख नोसीम वय 14 वर्षे ,मोहम्मद हुजैर वय 10 वर्ष ,सय्यद झियान वय 10 वर्ष ,एफरा वय 12 वर्ष इतर दोन मुले किरकोळ जखमी अवस्थेत नागरिकांनी कन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात उपचारासाठी भरती केले गंभीर जखमी चालक हा खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले आहे अपघाताची माहिती पालकांना मिळतात पालकांनी कंट्रोलमेंट बोर्ड रुग्णालयात येऊन किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना उपचार करून घरी घेऊन गेले अपघाताची माहिती वाहतूक पोलीस व नवीन कामठी पोलिसांना मिळाली असता पोलीस घटनास्थळी येऊन जखमी बाबत विचारपूस करीत आहेत.