कामठी तालुक्यात ‘आरटीई’ची साईट संथगतीने

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- शिक्षणहक्क कायद्या अंतर्गत (आरटीई)आर्थिक व दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांसाठी कामठी तालुक्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी पालकाकडुन 1 मार्च पासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे परंतु आरटीई ची साईट संथगतीने असल्याने ऑनलाइन अर्ज भरणाऱ्या पालकांची डोकेदुःखी होत आहे.

पालकांना आरटीई साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 1 ते 17 मार्च 2023 च्या रात्री 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com