गायक उत्कर्ष वानखेडे चे कन्हान शहरात जल्लोषात स्वागत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- सोनी टीव्ही वाहिनीवर यावर्षी ” इंडियन आयडॉल ” या संगीतमय मालिकेचे सीझन १४ सुरू झाले. उत्कर्ष वानखेडेची ऑडिशन होऊन त्यात निवड झाली. या स्पर्धेत एकापेक्षा एक सरस कामगिरी करित त्याने टॉप १० मध्ये प्रवेश मिळवला आणि संपुर्ण शोमध्ये स्वरांचे उत्तम सादरीकरण व गायन कलेचे उत्तम प्रदर्शन केले. काल (दि.५) फेब्रुवारी २०२४ ला मुंबई वरून परतल्यावर आंबेडकर चौक कन्हान येथे ग्रामीण पत्रकार संघ व शहरवासी आणि वानखेडे मित्र परिवाराव्दारे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.

कन्हान या ग्रामिण भागातुन असलेला उत्कर्ष रविंद्र वानखेडे ह्याने या आधी ” सूर नवा ध्यास नवा ” छोटे सुरवीर या प्रथम मालिकेत प्रवेश करीत अतिशय सुंदर व उत्कृष्ट गायनकलेचे सादरीकरण करीत त्याने टॉप ६ पर्यंत भरारी घेत आपला संगीत क्षेत्रात ठसा उमटवला. उत्कर्षला बालवयापासुन आजोबां व वडि लांपासुन संगीताचे संस्कार व बालकळु मिळाले, शाले य शिक्षण व संगीताचे शिक्षण घेत असतांना अवघ्या वयाच्या १० व्या वर्षी त्याने सर्वप्रथम ” द व्हॉईस किड स ” या एण्ड टीव्ही वरील स्पर्धेत सहभागी होत टॉप २० पर्यंत मजल गाठली होती. तेव्हा पासुन उत्कर्ष ने कधीच मागे बघितलं नाही, एकामागे एक स्पर्धेत सह भाग घेऊन आपल्यात असलेल्या कलेचा आविष्कार करीत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केलीत. वयाचे १२ व्या वर्षी सारेगमप लिटिल चॅम्पस या झी टीव्ही कृत गायन रियालिटी शोमध्ये सहभागी होत तो टॉप ६ च्या पंक्तीत जाऊन बसला, या शोमध्ये श्रोत्यांनी अक्ष रशः त्याच्या गायनाला दाद दिली. ” म्युझिक की पाठ शाळा व लव्ह मी इंडिया ” या संगीतमय मालिकेत त्याने १० एपिसोड पर्यंत उत्तम कामगिरी करीत आप ल्या कलेचे सादरीकरण केले. त्यानंतर कलर्स मराठी वाहिनी वरील “सूर नवा ध्यास नवा “, ” छोटे सुरवीर ” या संगीतमय रियालिटी शोमध्ये सहभागी होत फिनाले पर्यंत मजल गाठत टॉप ६ मध्ये पोहचुन स्वतःचे कतृत्व सिध्द केले.

यावर्षी कलर्स मराठी वाहिनी निर्मित ” सुर नवा ध्यास नवा पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे ” या सिझन ५ या संगीत गीत गायन रियालिटी शोमध्ये सहभागी हो ण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करीत अतिशय सुरेख व उत्तम, प्रतिभावंत गायन करीत स्पर्धे दरम्यान दोनदा राजगायक होण्याचा मान मिळवला. (दि.२५) सप्टेंबर ला मुंबईत झालेल्या ग्रँड फिनाले (महाअंतिम सोहळा) मध्ये ६ स्पर्धकांच्या समवेत अंत्यत चुरशीत लयबद्ध अप्रतिम सुरेल आवाजात शास्त्रीय संगीत च्या नियमाला धरून गाणी सादर करीत त्याने स्पर्धेचे विजे तेपद मिळवले. कलर्स मराठी वाहिनी तर्फे त्याला विजेता घोषित करून पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक प्रसिध्द संगीतकार ” कल्याणजी-आनंदजी फेम ” आनंदजी च्या हस्ते मानाची सुवर्ण कट्यार ” देऊन गौरविण्यात आले. यानंतर सोनी टीव्ही वाहिनीवर ” इंडियन आय डॉल सिझन १४” सुरू असलेल्या संगीतमय रियालिटी शोमध्ये ऑडीशन दिल्यानंतर उत्कर्षची निवड होऊन स्पर्धेत सहभाग मिळाला. एकापेक्षा एक सरस कामगि री करीत उत्कर्ष ने टॉप १० मध्ये प्रवेश मिळवित उत्त म कामगिरी करून आपले स्वतःचे, परिवाराचे, कन्हान शहर, नागपूर जिल्हा, महाराष्ट्र राज्याचा नावलौकिक केला. या स्पर्धेत परिक्षक म्हणुन प्रसिद्ध गायक कुमार शानु व श्रेया घोषाल प्रसिद्ध संगीतकार विशाल ददलानी यांनी परिक्षकांनी भूमिका वठवली. स्पर्धेचे संचालन प्रसिध्द अँकर हुसेन यांनी केले.

नागपूर, कामठी, कन्हान, टेकाडी व ग्रामिण परिसरात तेव्हाही उत्कर्स चे आगमनाच्या प्रसंगी भव्य दिव्य स्वागत करण्यात आले होते. तसेच सोमवार (दि. ५) फेब्रुवारी रात्री ११ वाजता मुंबई वरून त्यांचे आगम ण आंबेडकर चौक कन्हान येथे होताच ग्रामिण पत्रका र संघ कन्हान, कन्हान-कांद्री दुकानदार महासंघ, वान खेडे मित्र परिवार आणि शहरवासीया तर्फे उत्कर्ष वानखेडे चे पुष्पहार, पुष्पगुच्छाने भव्य स्वागत करून ” कन्हान की शान, उत्कर्ष वानखेडे के नाम” चा जय घोष करित ढोल वाजा सह बाईक रैलीने त्यांचे निवास स्थानी पोहचुन फटाक्याची आतिष बाजी करून महिलांनी आरती ओवाळत औषवंत आणि उत्कर्ष व सर्वाना पेढे चारून भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. या प्रसंगी कन्हान ग्रामिण पत्रकार संघ अध्यक्ष मोतीराम रहाटे, कमलसिंह यादव, सुनिल सरोदे, ऋृषभ बावनकर, आकाश पंडितकर किशोर वासाडे, दुकानदार संघा चे प्रशांत मसार, अविनाश कांबळे, दिपक तिवाडे, पंजाब दिवटे, अशोक खंडाईत, यशवंत खंगारे, रूपेश सातपुते, अरूण पोटभरे, राजा खोब्रागडे सह बहुसंख्ये ने वानखेडे मित्र परिवार, कन्हान शहरवासी प्रामुख्याने उपस्थित राहुन उत्कर्ष वर अभिनंदनाचा वर्षाव केला.

उत्कर्ष ने अंत्यत मेहनत व जिद्दीने वयाच्या १९ व्या वर्षी स्पर्धेत टॉप १० मध्ये आपले स्थान निर्माण करून परिवाराचे पर्यायाने आपल्या गावाचे नाव मोठे केले आहे. या विजयाने संपूर्ण कन्हान परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन उत्कर्षच्या यशाने संपुर्ण विदर्भाचा नावलौकिक झाल्याने उत्कर्ष चे सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. या यशाचे श्रेय त्याने आपले गुरू व वडील रविंद्र वानखेडे, आई शरयु वानखेडे, आजोबा सुधाकर वानखेडे, आजी सुलोचना वानखेडे, काका आशिष वानखेडे, काकु ज्ञानदेवी वानखेडे आणि समस्त कुटुंबीयांना दिले आहे. हा सर्वोच सन्मान दिल्याबद्दल परिक्षकांचे, संगीत चमु व सोनी वाहिनेचे उत्कर्ष ने आभार व्यक्त केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पेपर फुटणे, गैरप्रकार तसेच यूपीएससी, एसएससी इत्यादी भर्ती परीक्षा आणि नीट, जेईई आणि सीयूईटी सारख्या प्रवेश परीक्षांमध्ये होणाऱ्या संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ‘सार्वजनिक परीक्षण (गैरप्रकार प्रतिबंधक) विधेयक 2024’ लोकसभेत मंजूर

Wed Feb 7 , 2024
– आपल्या तरुणांचे भवितव्य पणाला लावणाऱ्या, त्यांच्या करिअर आणि आकांक्षा उध्वस्त करणाऱ्या आणि क्वचित आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या काही विवेकहीन घटकांचे भ्रष्ट व्यवहार रोखण्याचे या विधेयकाचे उद्दिष्ट: डॉ जितेंद्र सिंह नवी दिल्‍ली :- लोकसभेने आज यूपीएससी, एसएससी इत्यादी भरती परीक्षा आणि नीट, जेईई आणि सीयूईटी सारख्या प्रवेश परीक्षांमधील गळती, गैरप्रकार तसेच संघटित गैरप्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने ‘सार्वजनिक परीक्षण (गैरप्रकार प्रतिबंधक) विधेयक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com