संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– महाराष्ट्रात नागपुर जिल्हयाचे नावलौकिक केले
कन्हान :- पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्य स्तरीय जूनियर एथलेटिक्स स्पर्धेत बीकेसीपी शाळेची विद्यार्थीनी अनन्या मंगर हिने विजयश्री मिळवित रजत पदक प्राप्त करून कन्हान शहर व नागपुर जिल्हयाच़े महाराष्ट्रात नाव लौकिक केले.
राज्य स्तरीय जूनियर एथलेटिक्स स्पर्धेत अनन्या मंगर ने उत्कुष्ट प्रदर्शन करित एथलेटिक्स ट्रायथलॉन इवेंट १४ वर्ष वयोगटातील मुलीच्या धावनी स्पर्धेत विजयी होऊन नागपुर जिल्हया करिता रजत पदक प्राप्त केले. ही राज्य स्पर्धा पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये आयोजित केली होती.यात ट्रायथलॉन इवेंट मध्ये ६० मीटर धावनी (दौड़), लांब उडी आणि ६०० मीटर धावनी (दौड़) अश्या तीन प्रकारच्या खेळा चा समावेश होता. जूनियर राज्य स्पर्धेत रजत पदक प्राप्त करून अनन्या मंगर हिने वेस्ट झोन अँथलेटिक्स चॅम्पिअनशिप्स २०२४-२५ स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. ही स्पर्धा महाराष्ट्रातील नागपुर जिल्हयात अयो जित होणार आहे.
बीकेसीपी शाळेचे क्रिडा शिक्षक एनआईएसकोच अमित राजेंद्र ठाकुर सरांच्या मार्गदर्शनात अनन्या मंगर प्रशिक्षण घेत असुन तिच्या उत्कुष्ट प्रदर्शनामुळे संस्थेचे अध्यक्ष व शाळेचे संचालक राजिव खंडेलवाल यांनी तिची स्तुति करित सत्कार करून तिला पुरस्कृत केले. संस्थेच्या सचिव पुष्पा गैरोला, माध्यमिक मुख्याध्यापिका कविता नाथ, प्राथमिक मुख्याध्या पिका रुमाना तुरक, वरिष्ठ शिक्षक विनयकुमार वैद्य, क्रिडा शिक्षक अमित ठाकुर सर, सविता वानखेड़े, रेणु राउत, समिक्षा बादुले सह सर्व शिक्षक, शिक्षिकांनी अनन्या मंगर चे अभिनंदन करून पुढील स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या. अनन्या मंगर ने विजयाचे श्रेय तिचे आई, वडिल, क्रिडा प्रशिक्षक अमित ठाकुर सर, राष्ट्रीय खेडाळु मोठी बहिण सानिका मंगर आणि शाळेचे संचालक राजिव खंडेलवाल यांनी दिले आहे.