मोदीची कन्हान सभा श्यामकुमार बर्वे हयानी केली निष्फळ

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– बर्वे च्या विजयाचा कन्हान, कांद्री सह रामटेक विधान सभेत जल्लोष. 

– रामटेक लोकसभेत उमरेड आमदार पारवे चा कांद्री उपसरपंच बर्वे हयानी केला पराभव

कन्हान :- नागपुर जिल्हयातील शिवसेना (शिंदे गट) व भाजपाने प्रतिष्ठेची केलेली रामटेक लोकसभा सिट निवडुन आणण्या करिता कन्हान ला पंतप्रधान मोदी यांची प्रचार सभा घेऊन सुध्दा महाविकास आघाडी कॉग्रेसचे श्यामकुमार बर्वे हयानी विजयश्री प्राप्त करून कन्हानची मोदीची सभा निष्फळ केल्याने बर्वे च्या विजयाचा कन्हान, कांद्री सह रामटेक विधान सभे त जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

           सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ ची मंगळवार (दि.४) जुन ला झालेल्या मतमोजणी मध्ये रामटेक लोकसभा मतदार संघातुन शिवसेना (शिंदे गट) व भाजपा महायुती आघाडीचे उमरेड विधानसभा आमदार राजु पारवे यांचा महाविकास आघाडी कॉग्रेस चे कांद्री ग्रा प चे माजी उपसरपंच श्यामकुमार बर्वे हयानी पराभव करित दणदणीत विजयी झाले. महा विकास आघाडी कॉग्रेसचे श्याम कुमार बर्वे हे विजयी झाल्याने कन्हान येथे मोदीची प्रचार सभा ही निष्फळ केल्याने श्यामकुमार बर्वे च्या विजयाचा कन्हान, कांद्री सह रामटेक विधान सभेत गुलाल उधळुन, फटाके फोडुन आणि मिठाई वाटुन नागरिक जल्लोष साजरा करित आहे.

रामटेक लोकसभा निवडणुक महाविकास आघाडी चे कॉग्रेस नेते सुनिल केदार हयानी अंगावर घेतल्याने कॉग्रेसचे राजेंद्र मुळक, नरेश बर्वे, चंद्रपाल चौकसे, नागपुर जि.प माजी अध्यक्षा रश्मी बर्वे, सुरेश भोयर, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार प्रकाश जाधव, जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले, उत्तम कापसे, प्रेम रोडेकर, राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) अनिल देशमुख, किशोर बेलसरे, सलील देशमुख आदीच्या पुढाकाराने महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यानी प्रचारात जोमाने कार्य करून आघाडी घेतल्या नेच कॉग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांचा विजय झाला असल्याचे बोलल्या जात आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा व रालोआ च्या सलग तिसऱ्या विजयाचे अभिनंदन - ॲड. धर्मपाल मेश्राम 

Wed Jun 5 , 2024
नागपूर :- लोकसभा निवडणुकीच्या निकालात जनतेने भाजपा आणि एनडीए ला स्पष्ट बहुमत दिले आहे. महाराष्ट्रामध्ये संविधान बदलाचे नॅरेटिव्ह दुर्दैवाने आम्ही तोडू शकलो नाही. महाराष्ट्रात विरोधकांची एकजूट, धार्मिक ध्रुवीकरण आणि सहानुभूतीच्या आधारावर राज्यात विरोधकांना यश मिळाले. उबाठा गटाचे कार्यकर्ते “बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाना” च्या उक्तिनुरूप आनंद साजरा करत आहेत. मृतप्राय काँग्रेसला जीवनदान देण्याचं काम करणाऱ्या उबाठा नेतृत्वाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com