नागपूर, २३ फेब्रुवारी २०२२: स्वच्छतेतून ग्रामविकासाचा मार्ग दाखविणारे थोर समाजसुधारक, ग्रामसुधारणेचे जनक आणि कीर्तनकार श्री. संत गाडगेबाबा उर्फ डेबूजी महाराज यांची १४६वीं जयंती आज बुधवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली. नामप्रविप्रा’चे अपर आयुक्त श्री. अविनाश कातडे यांच्याहस्ते श्री. संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी नासुप्रचे कार्यकारी अधिकारी अनिल राठोड, कार्यकारी अभियंता ललित राऊत आणि नामप्रविप्राच्या सहायक अभियंता-१ श्रीमती जागृती झोडे तसेच ‘नामप्रविप्रा आणि नासुप्र’चे ईतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
नासुप्र येथे श्री. संत गाडगे महाराज यांची १४६वीं जयंती साजरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com