नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील सेपक टॅकरा स्पर्धेचे महिलांमध्ये श्री नक्षत्र स्पोर्ट्स क्लब आणि पुरुषांमध्ये डब्ल्यू वॉरिअर्स संघाने विजेतेपद पटकावले.
शुक्रवारी (ता.13) सायंकाळच्या सत्रात नरेंद्र नगर येथील लक्षवेध मैदानात स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला.
महिला गटात नक्षत्र स्पोर्ट्स क्लब संघाने डिव्हाईन एलेमेंट्स संघाचा 2-0 अशा फरकाने पराभव केला. विजेत्या संघाची सोनल धाडसे उत्कृष्ट खेळाडू ठरली. उपांत्य फेरीत नक्षत्र स्पोर्ट्स क्लब संघाने ट्रिनिटी वॉरिअर्स संघाला 2-1 ने नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर उपविजेत्या डिव्हाईन एलेमेंट्स संघाने रिबल गर्ल्स संघाचा 2-1 ने पराभव करून नक्षत्र चे आव्हान स्वीकारले होते.
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात ट्रिनिटी वॉरिअर्स संघाने रिबल गर्ल्स संघाला मात दिली.
पुरुष गटात डब्ल्यू वॉरिअर्स संघाने अंजूमन हामी ए इस्लाम स्पोर्ट्स अकादमी संघाला 2-1 ने नमवून जेतेपदावर नाव कोरले. विजेत्या संघाचा अनिकेत काळे उत्कृष्ट खेळाडू ठरला. डब्ल्यू वॉरिअर्स संघाने अवदेश क्रीडा मंडळ संघाचा 2-0 ने पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात अंजूमन हामी ए इस्लाम स्पोर्ट्स अकादमी संघाने डब्ल्यू थंडर संघाचा 2-0 ने पराभव करून अंतिम फेरीतील आव्हान स्वीकारले.
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात अवदेश क्रीडा मंडळ संघाने डब्ल्यू थंडर संघाला नमविले.