संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी : स्थानीय सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील इतिहास विभाग व विशेष दिवस कार्यक्रम समितीच्या संयुक्त विद्यमानाने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिवस हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. कार्यक्रमचे सुरवात गणमान्य व्यक्तिंच्या हस्ते छत्रपति शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रावर माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलित करून करण्यात आली. विशेष दिवस कार्यक्रम समिती व कार्यक्रमाचे समन्वयक इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र सावजी तागड़े यांनी कार्यक्रमाचा उद्देश्य स्पष्ट करतांना स्वराज्य व शिवराज्याभिषेकाची आवश्यकता आणि परिणामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनिष चक्रवती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रजाहितकारी राजा म्हणतांना जाणता राजाचे गुणगाण केले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथि साँईबाबा महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख डॉ. योगेन्द्र नगराळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमीकावा युद्ध पद्धिती व महाराष्ट्राची भौगोलिकता यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी इतिहास अभ्यास मंडळाचे सल्लागार डॉ. जयंत रामटेके, डॉ. यशवंत मेश्राम, डॉ. अज़हर अबरार, ग्रंथपाल शिल्पा हिरेखन, गिरीश संगेवार, संतोष गुप्ता, मानवटकर मॅडम, उमेश बांगर सहित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संचालन डॉ. सिद्धार्थ मेश्राम तर आभार विशेष दिवस कार्यक्रम समितीचे सदस्य डॉ. विकास कामडी यांनी मानला.