कामठी नगर परिषदेला पारंपारिक व्यवसाय कुंभार, पेंटर, मूर्तिकार यांना नगर परिषद क्षेत्रात व्यवसायिक विक्री जागा मिळवून देण्याबाबत शिवसेना उबाठा तर्फे मुख्याधिकारी यांना मागणी नगर परिषदेला निवेदन

संदीप कांबळे, विशेष, प्रतिनिधी 

कामठी :- कामठी शहरातील व कामठी शहरालगत असलेल्या पारंपारिक मातीचे मूर्तिकार व कारागीर यांचा चरीतार्थ त्यांचे व्यवसायावरच अवलंबून असून अत्यंत परिश्रमाने घाम गाळून तयार केलेल्या मुर्त्या व अन्य सामग्री सजावटीचे सामान सणासुदीला व श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, लक्ष्मीपूजन या सर्व सणात आवश्यक असलेल्या पूजेच्या देवी-देवतांच्या तयार केलेल्या मुर्त्या,व अन्य साहित्य विक्री करिता नगर परिषदेने कोणत्याच प्रकारची व्यवस्था न.प. संकुलातील गाळे रिझर्व न ठेवल्याने यांना आपले उत्पादन विकण्यासाठी तयार केलेले मुर्त्या विकण्यासाठी बाजारपेठेत कुणाचे तरी रिकामे गाळे शोधावे लागतात. त्यात अत्यंत परिश्रमाने वर्षभराच्या उदरनिर्वाहासाठी चालवलेल्या या लोकांच्या परिस्थितीचा फायदा घेत रस्त्यावर जरी दुकान टाकले तरी यांच्या दुकानासमोर दुकान लावले ते सुद्धा त्यांना मदत न करता त्यांच्याकडून भरपूर रक्कम उकळतात. नगरपरिषद कामठी यांनी कधीही अशा लोकांचा विचार केला नसल्याने या गंभीर बाबीचे निवेदन आज नागपुर जिल्हा संघटक प्रमुख राधेश्याम हटवार यांचे नेतृत्वात कामठी नगर परिषदेला देण्यात आले.

यावेळेस नगरपरिषद मुख्याधिकारी हे मुंबई मंत्रालयात नगरपरिषदचे कामात असल्याने भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्याशी संपर्कप्रमुख करून निवेदनाची माहिती देण्यात आली निवेदन नगरपरिषद चे स्वास्थ विभाग अधिक्षक विजय मेथीया यांनी स्वीकारले यावेळेस कामगार सेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत खोब्रागडे, कामगारसेनेचे शहरप्रमुख सुंदर सिंग रावत, भाविसे शहर प्रमुख राजेश चहांदे, कामठी शहर माजी महिला आघाडी प्रमुख ममता नायक, विराग जोशी, मुन्ना प्रजापती, उमेश भोकरे, संजय वैद्य,अरशदखान, ममता प्रजापती, रुपेश प्रजापती, गजाननप्रजापती, अशांक प्रजापती, दिनेश प्रजापती, निलेश प्रजापती, प्रशांत प्रजापतीआदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पीएम गतिशक्ति योजनेतर्गत नाशिकमधील मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्कसह सहा पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन

Fri Aug 23 , 2024
नवी दिल्ली :- पीएम गतिशक्ति योजनेच्या अंतर्गत नेटवर्क योजना गटाच्या (NPG) 77 व्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिकयेथील प्रस्तावित मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्कासह सहा महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. या प्रकल्पांमध्ये गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, आणि अंडमान आणि निकोबार द्वीपसमूहातील विविध प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील परिवहन क्षमतेत अधिक सुधारणा होईल,आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com