अरोली :- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जि प प्राथमिक शाळा तोंडली येथे साजरी करण्यात आली.यावेळी पारपरिक वेशभूषा नटलेले बालगोपाल जयभावांनी, जयशिवाजी अशा जयघोष करत शिवमय वातावरणात शिवछत्रपतींच्या फोटोला पूजा अर्चना व माल्य अर्पण करून माणवंदना देण्यात आली .
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर तिजारे, उपाध्यक्ष अतकरी, माजी उपसरपंच सुरेंद्र बाभरे, शाळेच्या मुख्याध्यपाक अनुराधा दुर्डे ,भास्कर ठवकर, रणजित ईश्वरकार , कवी बांते ,निलेश ठवकर , रामकृष्ण तिजारे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेमध्ये लोकनिधीतून संगणक कक्ष तसेच बालवाचनालयाचे उदघाटन करण्यात आले .या कार्यक्रमात शाळेसाठी मिल्ट्री जवान राजेंद्र बांते यांनी शिवांजी महाराज यांची प्रतिमा भेट स्वरूपात दिली.