संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- शहरात आणि परिसरातील राशन दुकान दारांचा विविध समस्या मागिल अनेक दिवसापासुन वाढल्याने राशनकार्ड धारकांना आणि दुकानदारांना अडी अडचणीचा त्रास सहन करावा लागच असल्याने रास्त भाव दुकानदार संघटना च्या पदाधिका-यानी तहसिलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन चर्चा करित निवेदन देऊन तात्काळ राशन दुकानदारांच्या अडचणी सोडवण्याची मागणी केली आहे.
निवेदनात सांगितले कि, पीओएस मशीन सॉफ्ट वेयर चेंज झाले असुन एकाच व्यक्तीला धान्य दायचे असेल तर दोन वेळा थम द्यावे लागत असुन रेगुलर एक वेळ व फ्री एक वेळ द्यावे लागत असल्याने राशन दुकानदारांना आणि कार्ड धारकांना (ग्राहकांना) अडी अडचणीचा सामाना करावा लागत आहे. अगोदर दोन्ही मालाची एकच पावती निघत होती. ठेकेदार दुकानात माल उशीरा पाठवत असल्याने राशन दुकानदारांना वाटप करतांनी भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. मागिल डिसेंबर २०२१ पासुन पीएम.के. वाय चे कमीशन दुकानदारांना आता पर्यंत मिळाले नाही. अश्या अनेक समस्या बाबत रास्त भाव दुकान दार संघटनाच्या पदाधिका-यानी अध्यक्ष रूपेश बोंदरे यांच्या नेतृत्वात तहसिलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन चर्चा करित निवेदन देऊन तात्काळ राशन दुकानदारांच्या आणि ग्राहकांच्या अडचणी सोडवण्याची मागणी केली आहे. यावेळी तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी सर्व अडचणीवर तोडगा काढुन डी.एस.ओ. शी बोलुन दुकानदारांचे समाधान केले असु न चार महिन्याचे कमीशन येत्या तीन ते चार दिवसात काढुन देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी रास्त भाव दुकानदार संघटना अध्यक्ष रूपेश बोंदरे, उपाध्यक्ष सुनिता मानकर, सचिव गजेंद्र सावरकर, रंजना मेश्राम , एम.व्ही. वर्धन, मिना चौधरी, चि.मा.ढोबळे, सुषमा सोमकुवर, सुचना चहांदे, रजनी वानखेडे, सुर्यभान झोडावने, विजय जैन, बापुराव दिवटे, वैभव काळे सह दुकानदार प्रामुख्याने उपस्थित होते.