रनाळा येथे युवा चेतना मंच तर्फे शिवजयंती साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती युवा चेतना मंच तर्फे विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती श्री शिवाजी महाराज नित्य पुजन समीती, हिंदू जागरण मंच यांच्या सयुक्त विद्यमानाने सकाळी ७ वाजता कामठी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांचे अभिषेक करून विधीवत पूजन करूण महाराजांना माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी सामूहिक शिवस्तुती घेण्यात आली तसेच सकाळी ९ वाजता रनाळा चौक येथे महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विधीवत पूजन करण्यात आले व सामूहिक शिवस्तुती घेण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कामठी तालुका भा.ज‌ पा उपाध्यक्ष अतुल ठाकरे , वरीष्ठ शिक्षक मधुकर गिरी, युवा मार्गदर्शक शंशाक कुकडे,पोलिस पाटील विशाल आमधरे , ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपाटे , मयुर गणेर, कामठी महिला अर्बन क्रेडिट संस्था चे संचालक नितीन ठाकरे जेष्ठ नागरिक संघटनेचे गणेश सपाटे, देशमुख निर्गुण पटेल, रमेश अग्रवाल , रामचंद्र नागपुरे,दिव्यांग फाऊंडेशनचे सचिव बाॅबी महेंद्र, उपाध्यक्ष अजय ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते अशोक ठाकरे, रनाळा भा.ज.पा महामंत्री प्रमोद येलेकर प्रामुख्याने उपस्थित होते .

याप्रसंगी सामूहिक शिवस्तुती व सामूहिक शिव -ललकारी घेण्यात आली . विशेष आकर्षण म्हणुन बालकानी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनप्रवास यावरील प्रसंग सादर केले .या कार्यक्रमाचे संयोजन युवा चेतना मंचचे शिव उत्सव प्रमुख मयुर गुरव, सह- प्रमुख कुणाल सोलंकी ,भूषण ढोमणे , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय खोपे तर आभार प्रदर्शन नम्रता अढाऊ यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा.पराग सपाटे, अमोल नागपुरे, हिमांशू लोंडेकर , कमलाकर नवले, शेषराव अढाऊ, लक्ष्मीकांत अमुतकर, नरेश सोरते, प्रफुल्ल बावनकुळे, प्रफुल्ल सिगांडे, तौशिक बावनकर, पंकज ढोमणे, रूपेश चकोले, सतीश नवले,सौ.प्रिया निमकर आदी नी परीश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सामाजिक जाणिवेतून वाढदिवस साजरा करावा निखिल जैन यांचे प्रतिपादन

Mon Feb 19 , 2024
गोदिया :- पाश्चात्य जीवन पद्धतीचा प्रभाव आपल्या संस्कृती व दैनंदिन जीवनासोबतच अगदी वाढदिवस साजरा करण्याच्या पध्दतीवरही पडला आहे. वाढदिवसाला औक्षण करण्याची पध्दत बदलून त्याची जागा केक कापणे आणि मेणबत्ती फुंकणे यांसारख्या पाश्चात्य पध्दतीनी घेतली आहे. मात्र या परंपरेला बगल देऊन सामाजिक जाणिवेतून वाढदिवस साजरा करावे असे प्रतिपादन गोंदिया शिक्षण संस्थेचे संचालक निखिल राजेद्र जैन यांनी केले. न्यु.जी.ई.एस. फोरम, गोंदिया शिक्षण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com