आता शेअर करा सायकल, वायु प्रदूषण कमी करण्यास मनपाचा उपक्रम

चंद्रपूर :- राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर शहरात इंधनविरहित पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाउल उचलले आहे. शहरात सायकल चालविण्यास प्रोत्साहन मिळावे व नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा, यासाठी शहरात राजीव गांधी उद्यान येथे ‘ शेअरिंग बायसिकल ‘ (सार्वजनिक सायकल सुविधा) हा उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवार ७ सप्टेंबर रोजी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत २० सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या असुन राजीव गांधी उद्यान पठाणपुरा येथे नोंदणी व मासिक शुल्क भरून नागरिकांना भाडेतत्त्वावर सायकलींचा वापर करता येणार आहे. यासाठी अगदी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असुन केवळ १०० रुपयात महिनाभर सायकल चालविता येणार आहे.

आज शहरात वाहनांची गर्दी होत असतांना अनेक गरजुंना वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत किंबहुना ते घेऊ शकत नाही. अश्यावेळेस इतर सार्वजनिक वाहतुकींच्या साधनांचा वापर करण्याऐवजी सायकल हा कुठल्याही प्रकारचे वायु प्रदूषण न करणारा सोपा पर्याय आहे.तसेच माफक शुल्कात उपलब्ध असल्याने सहज वापरण्याजोगा आहे.बाईक प्रेमी तरुणाईत सायकलप्रेम जागविण्याचा दृष्टीने मनपातर्फे सायकल शेअरिंग प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आले आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात कामगार, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी येत असतात. रिक्षा किंवा इतर साधनांसाठी मोजाव्या लागणाऱ्या पैशांपेक्षा हा उपक्रम अधिक किफायतशीर ठरणार असल्याने अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

याप्रसंगी माजी नगरसेवक नंदू नागरकर,अश्विनी अलगमवार, नीता आढोणे, वैशाली आढोणे, अनुराधा काळमेघ, वर्षा सोनटक्के, रेखा रामटेके,रोहिणी काळमेघ,वर्षा खनके,पवन पुथोडे,प्रगती गुळकरी,पुष्पा नागरकर,प्रकाश चहारे,अनिता दुरटकर,रवींद्र नेरकर,अंजली साठोणे,प्राप्ती दहीवडे,माधुरी मेश्राम व परिसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कमला नेहरू महाविद्यालयामध्ये "वाचन लेखन चळवळ" कार्यक्रम संपन्न

Tue Sep 12 , 2023
नागपूर :- कमला नेहरू महाविद्यालयामध्ये वाचन लेखन चळवळ” अंतर्गत मनोविकास प्रकाशनाचे संचालक अरविंद पाटकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही वाचन लेखन चळवळ निर्माण करण्यात आली आहे. अरविंद पाटकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि वाचन व लेखनामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात व पुस्तक प्रकाशनाचे व्यवसाय सुरु करावे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी अमर सेवा मंडळाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!