शाहूंची 150 वी जयंती, 30 ला दीक्षाभूमीवर विद्यार्थी परिषद 

नागपूर :-कही हम भूल न जाये या अभियानांतर्गत छत्रपती शाहूजी महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने दीक्षाभूमी वरील ऑडिटोरियम मध्ये 30 जून रोजी दिवसभर एका भव्य विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व छत्रपती शाहूंच्या उपस्थितीत 22 मार्च 1920 रोजी माणगाव येथे झालेल्या अस्पृश्य परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहूंची जयंती सणासारखी साजरी करावी असा ठराव पास केला होता. तोच आधार या परिषदेचा आहे.

आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक ऍड अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सुप्रीम कोर्टाचे वकील ऍड रितेश पाटील व आंबेडकरी चळवळीच्या अभ्यासिका ऍड अश्विनी मून प्रामुख्याने मार्गदर्शन करतील. या प्रसंगी पन्नासावर विद्यार्थी महापुरुषांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकतील.

ही ऐतिहासिक विद्यार्थी परिषद यशस्वी करण्यासाठी 11 जून ते 20 जून पर्यंत संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये चालता फिरता शाहू मेळा चे आयोजन करण्यात आलेले आहे. ग्रामीण व शहराच्या प्रत्येक प्रमुख वस्त्यांमध्ये व चौका-चौकात शाहू मेळ्याच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेची माहिती देण्यात येत आहे. या विद्यार्थी परिषदेच्या यशस्वीतेसाठी एड रितेश पाटील, एड अश्विनी मून, इंजि बाळू रत्नपारखी, उत्तम शेवडे, एनआर उके, युवराज भांगे, जयश्री रत्नपारखी, रोहित शिंगाडे, रजत मेश्राम, निर्वाण मून, विराज मेश्राम, अथवेद गजभिये, रश्मी रंगारी, विराज रत्नपारखी आदि चळवळीतील मिशनरी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Teachers Workshop at DPS MIHAN

Thu Jun 20 , 2024
Nagpur :- A workshop on the classroom dynamics and management was taken recently by the counsellor of Delhi Public School, MIHAN Anushka Bhargava. The workshop aimed to equip educators with advanced skills and strategies for managing classroom dynamics effectively.The workshop included lectures, interactive sessions, and practical activities designed to address common challenges in classroom management and promote a positive learning […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com