– विविध प्रलंबीत योजना कार्यान्वित करण्याची रेटणार मागणी
रामटेक :- शाहीर कलावंतांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्याकरिता आपल्या जिवाचे रान केले आहे.समाजातील वाईट प्रथेला व कुप्रथेला आळा घालण्याकरिता आपल्या कलेच्या माध्यमातून प्रचंड प्रहार करून समाजाला प्रबोधित केले आहे. लोकाला हीच आपली खरी संस्कृती आहे व ती टिकून ठेवण्याचे व तिचे जतन व संवर्धन करण्याचे काम शाहीर कलावंतांनी आपले प्राण तळहातावर घेऊन प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून उत्तम प्रकारे केले आहे. असे असले तरी मात्र या शाहीर कलावंतांसाठी शासनाने नेमुन दिलेल्या काही योजना अद्यापही कार्यान्वीत न झाल्याने त्यांच्यापुढे विविध समस्या आ वासुन उभ्या ठाकल्या आहेत.
संतांनी घालून दिलेला वारसा शाहीर कलावंत टिकून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत . आपल्या महाराष्ट्रात विविध लोककला आहेत. खडीगंमत ,दंडार, भजन, भारुड , दशावतार, तमाशा, लावणी, इत्यादी सारख्या लोक कला जिवंत ठेवण्याचे काम शाहीर कलावंत अविरतपणे करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांचा मानसन्मान करून गौरव प्रदान केला होता. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने सुद्धा कलावंतांकरिता अनेक योजना आखल्या आहेत. परंतु काही योजना अजूनही कार्यान्वित झालेल्या नाही व जे मिळत आहेत त्या अत्यंत तुटपुंज्या आहेत. तेंव्हा आपल्या न्यायासाठी हक्कासाठी व मागण्यासाठी दिनांक 19 डिसेंबर रोजी सोमवारला भव्य मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. मोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन शाहीर अलंकार टेंभुर्णे कार्याध्यक्ष विदर्भ शाहीर कलाकार परिषद यांचेसह मनीष भिवगडे, राजकुमार घुले , दयाल कांबळे , वसंत कुंभरे , शंकर रामटेके ,हरिश्चंद्र कार्लेकर ,केशव नारनवरे , राजकुमार गायकवाड , गौरीशंकर गजभिये ,पुरुषोत्तम निघोट ,रामेश्वर दंडारे ,वसंताा दुडे विद्या लंगडे , निशा खडसे , प्रभाताई निंबाळकर , उर्मिला वाडी इत्यादी कलावंतांनी केलेले आहे.