शाहीर कलाकारांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आमरण उपोषण करणार – शाहीर बावनकुळे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– संतांची संयुक्त जयंती व भव्य कलाकार मेळा व्यात लोककलावंत व पत्रकारांचा सत्कार

कन्हान :- भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया व्दारे छत्रपती शिवाजी महाराज, श्री विश्वकर्मा, संत गाडगे बाबा, संत रविदास व लोकशाहीर वस्ताद स्वर्गीय भिमराव बावनकुळे यांची संयुक्त जयंती उत्सव व भव्य कलाकार मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमा सह भजन मंडळी, शाहीर कलाकार आणि पत्रकारांचा सत्कार सोहळा थाटात संपन्न करण्यात आला.

शुक्रवार (दि.१) मार्च ला कुलदीप मंगल कार्या लय रायनगर कन्हान येथे सकाळी ११ वाजता संतांची संयुक्त जयंती उत्सव व भव्य कलाकार मेळाव्याचे उदघाटक युवा काग्रेस चे रोहित नरेश बर्वे, व पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे आणि भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया अध्यक्ष, सदस्य वृध्द कलावंत मानधन समिती नागपुर, आकाशवाणी व कैसेट सिंगर शाहिर राजेंद्र बावनकुळे यांचे अध्यक्षेत आणि प्रमुख अतिथी माजी आमदार देवराव रडके, जि प सदस्य व्यंकटेश कारेमोरे, शिवसेनेचे राधेश्याम हटवार, चंद्रशेखर अरगु ल्लेवार, योगिता नंदनवार, शाहीर डी मेश्राम, शा. ब्रम्हा नवघरे, विक्रम वांढरे, मसेसं चे शांताराम जळते, नाना ठवकर, प्रेमलाल भोयर, पंढरी जैंजाड, वामन देशमुख, नरेंद्र महल्ले, शिशुपाल अतकरे, नरहरी वासनिक सह शाहिर कलाकारांच्या हस्ते संतांच्या प्रतिमेचे तसेच स्वर्गीय वस्ताद भिमराव बावनकुळे यांच्या प्रति मेचे पुजन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. शाहिर कवी वांढरे यानी प्रास्ताविकातुन कार्यक्रमाची माहिती स्पष्ट केली. यावेळी मान्यवरांनी संतांच्या व स्वर्गीय भिमराव बावनकुळे यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी युवा शाहीर आर्यन अंबादास नागदेवे, प्रदीप कुरेकर पाटील यांचा विशेष सत्कार करून शाहिर कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम विविध भजन, पोवाडे, डाहाका, गीत सादर करुन उपस्थिताना मंत्रमुग्ध करित मेळाव्यात रंगत आणली. तदंतर शाहिर कालाकार व पत्रकार अजय त्रिवेदी, मोतीराम रहाटे, कमलसिंह यादव, सुनिल सरोदे, नितीन रावेकर, ऋषभ बावनकर, रविंद्र दुपारे, दिलीप मेश्राम, आकाश पंडितकर, निलेश गाढवे आदीना शाॅल, सम्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन संतांची संयुक्त जयंती व भव्य कलाकार मेळावा थाटात साजरा करण्यात आला. भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया सदैव शाहिर लोककलावंता च्या न्याय हक्का करिता कार्य करित असुन शासना व्दारे शाहिर लोककलावंताच्या प्रलंबित मागण्या पुर्ण नाही झाल्या तर आमरण उपोषण सुध्दा करणार अशा ईशारा अध्यक्षीय मार्गदर्शनातुन शाहिर राजेंद्र बावनकुळे हयानी दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवराज अडकणे यानी तर आभार शाहीर भगवान लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमास विदर्भातील शाहिर लोककलावंत मोठया संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शाहिर मोरेश्वर बडवाईक, नत्थुजी चरडे , चिरकुट पुंडेकर, राजेंद्र लक्षणे, भुपेश बावनकुळे, गजानन वडे, रविंद्र मेश्राम, सुभाष देशमुख, रविंद्र दुपा रे, प्रभाकर भोयर, वीरेंद्र शेंगर, गिरिधर बावणे, लीलाधर वडांद्रे, प्रफुल भनारे, विमल शिवारे, सिंधु चौहान, अरूणा बावनकुळे, महादेव पारसे, श्रावण लांजेवार, नितीन लांजेवार, लक्ष्मण चकोले, कैलाश कारेमोरे आदी सह बहु संख्येने शाहिर कलाकार, लोक कलावं तानी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Mon Mar 4 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम दरवर्षी राबविण्यात येते .भारतामध्ये 13 जानेवारी नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळुन आलेला नाही असे मौलिक मत अंगणवाडी सेविका सुषमा खोब्रागडे यांनी पल्स पोलिओ लसीकरण केंद्रावर व्यक्त केले. यानुसार आज कामठी तालुक्यातील शहर तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com