– चिडीमार म्हणजे फालतू टाईमपास ही कथा एक सामान्य माणसावर आधारित असून सामान्य माणसांनी अवश्य बघा
नागपूर :- एस एफ इंटरटेनमेंट निर्मित २७ जून २०२४ रोजी सकाळी ९ वाजून ९ मिनिटांनी यूट्यूब चैनल वरील चिडीमार या हिंदी मूवी चे प्रदर्शन होणार आहे. चिडीमार मूवी हिंदी भाषेत असून गांधीबाग मार्केट मधील कपड्यांच्या व्यापाऱ्यावरील फिल्म ची कहाणी लिहिल्या गेली आहे. या फिल्मचे निर्माता तथा निदर्शक सिद्धार्थ फिल्मवाला उर्फ सिद्धार्थ रामटेके असून यांनी स्वतःच फिल्ममध्ये अभिनेत्याचा रोल करून पुर्ण पणे फिल्म मध्ये काम केले आणि फिल्मची एडिटिंग, बॅकग्राऊंड, संगीत, कहानी यांनी स्वतःच तयार केली. नागपुरातील मुव्ही फिल्म चे चित्रीकरण सक्कदरा, इतवारी, नंदनवन, महाल, छापूरु नगर चे गार्डन या ठिकाणी करण्यात आली. या मूवी फिल्म चे अभिनेते सिद्धार्थ फिल्मवाला उर्फ सिद्धार्थ रामटेके यांचा आखरी पर्यंत मेन रोल केला असून यावेळी इतरही कलावंतांनी भाग घेतला. त्यापैकी क्रिष्णा कपूर, ( आईच्या भुमिकेत) भूपेंद्र तिवारी, पंडित महेश नबिरा (मामा च्या भुमिकेत) आकाश निकोसे, सारंग कुमार, मुकुंद महाजन, अश्विन वघाले (कार्यालयीन BOSS च्या भुमिकेत) आणि मधु ठाकूर यांनी भूमिका केल्या.
चिडीमार म्हणजे फालतू टाईमपास करणे – ही कहानी एका व्यक्तीची आहे जो दुसऱ्यासाठी काम करतो, त्याच्या मालकाचे म्हणणे ऐकतो आणि एक दिवस त्याला समजते की त्याने आपली गुलामीची नोकरी सोडून कपड्यांचा व्यवसाय सुरू करावा परंतु कोणीही मित्र त्याला मदत करत नाही आणि त्याच्या कुटुंबाच्या मदतीने व्यवसाय सुरू करतो. पण त्याला व्यवसायात येणारी आर्थिक मंदी समजू शकत नाही आणि त्याचा व्यवसाय उद्ध्वस्त होतो. मग तो व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या चुकांमधून आणि समाजात होणाऱ्या चुकांमधून धडा घेऊन व्यवसायात परत येतो. हा चित्रपट सामान्य माणसाला व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि या चित्रपटाचे बजेट जेवढे लोक खिशात आयफोन घेऊन जातात तेवढेच आहे. येत्या 27 जून रोजी यूट्यूब चैनल वरील ही मूवी प्रसारित होत असून सगळ्यांनी एस एफ एंटरटेनमेंट वर जाऊन मूवी बघण्यास विसरू नका तसेच हि मूवी एका सामान्य माणसाची कथा असून आपण सर्वांनी हि कथा बघायला पाहिजेत असे त्यांनी पत्रकारांना परिषदेत सांगितले.