दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई :- दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने तब्बल सात पुरस्कार पटकावले आहेत. ‘सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य हा पुरस्कार दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांना घोषित झाला आहे. सन 2021 व 2022 या दोन वर्षांचे हे पुरस्कार असून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविले होते.

सन 2021 मध्ये अशोक तुकाराम भोईर, ठाणे (सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), विमल पोपट गव्हाणे, पुणे (श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), डॉ. शुभम रामनारायण धूत, पुणे (श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), जिल्हा परिषद, अकोला (दिव्यांग अधिकार कायदा/ वैश्विक ओळखपत्र प्रणाली तथा दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा जिल्हा) तसेच सन 2022 मध्ये जयसिंग कृष्णाराव चव्हाण, नागपूर (सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती) महात्मा गांधी सेवा संघ, औरंगाबाद (दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत सर्वश्रेष्ठ संस्था), दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे (सुगम्य भारत अभियानाची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य) यांना हे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्या हस्ते दि. 03 डिसेंबर,2022 रोजी नवी दिल्ली येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती दिव्यांग आयुक्तालय पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फुकट नगर कांद्री ला चोरीचा दगडी कोळसा पडकला

Fri Nov 25 , 2022
कारवाईत मारूती सुजुकी वाहना सह एकुण ३४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस दोन कि मी अंतरावरील फुकट नगर कांद्री कन्हान येथे चोरी करून दगडी कोळसा विकण्या करिता जमा केलेला कन्हान पोलीसांनी व वेकोलि च्या अधिका-यानी पकडुन मारूती सुजुकी चारचाकी वाहन आणि कोळसा असा एकुण ३४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!