फुकट नगर कांद्री ला चोरीचा दगडी कोळसा पडकला

कारवाईत मारूती सुजुकी वाहना सह एकुण ३४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त. 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस दोन कि मी अंतरावरील फुकट नगर कांद्री कन्हान येथे चोरी करून दगडी कोळसा विकण्या करिता जमा केलेला कन्हान पोलीसांनी व वेकोलि च्या अधिका-यानी पकडुन मारूती सुजुकी चारचाकी वाहन आणि कोळसा असा एकुण ३४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.२३) नोव्हेंबर ला दुपारी १२ वाजता दरम्यान वेकोलि सुरक्षा अधिकारी रविकांत रामदास कंडे हे आपल्या सुरक्षा रक्षकासह वेकोलि परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली कि फुकट नगर कांद्री वस्ती मध्ये एका व्यक्तीने वेकोलिचा कोळसा चोरून मारोती सुजुकी ८०० एम एच ३१ ए एच ६६९० मध्ये अंदाजे ४०० ते ५०० किलो दगडी कोळसा भरला आहे. या माहिती वरून रविकांत कंडे यांनी पोलीस स्टेशन कन्हान येथे फोन करून पोलीसांना बोलावुन फुकट नगर कांद्री ला जाऊन पाहणी केली असता तेथे चोरीचा कोळसा चार चाकी कार मध्ये भरलेला दिसुन आला. सदर दगडी कोळसा हा आरोपी संदीप रमेश बुंदेलिया रा. संताजी नगर कांद्री कन्हान याने चोरून विकणे करिता दगडी कोळसा फुकट नगर येथे जमा केला होता. कोळशाचे अंदाजे प्रति किलो ८ रूपये प्रमाणे ४,००० रूपयाचा कोळसा तसेच मारूती सुजुकी ८०० चारचाकी क्र एम एच ३१ ए एच ६६९० वाहन किंमत अंदाजे ३०,००० रूपये असा एकुण ३४,००० रूपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने कन्हान पोलीस व वेकोलि सुरक्षा अधिकारी यांनी जप्त करून पोलीस स्टेशन कन्हान ला आणुन जमा केला. सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी फिर्यादी सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे यांच्या तक्रारीने पोस्टे ला आरोपी संदीप रमेश बुंदेलिया यांचे विरुद्ध कलम ३७९ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हुद्यनारायण यादव यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील करित आहे.

NewsToday24x7

Next Post

एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या शिष्ट मंडळाची नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट

Fri Nov 25 , 2022
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपूर मेट्रोरेल प्रकल्प) • ३ दिवसीय दौऱ्यादरम्यान विविध विषयांवर केली चर्चा नागपूर :-  एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) ४ सदस्यीय शिष्ट मंडळाने महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा तीन दिवसीय दौरा केला. सदर दौऱ्यात एडीबीचे मुकुंद सिन्हा, शरद सक्सेना,कौशल शाहू आणि मिहीर सोरती या चार अधिकाऱ्यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com