रेल्वे स्टेशन प्रबंधक कार्तिक घोष यांचा सेवनिवृत्तीपर सत्कार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– निरोप समारंभात अनेकांना आले गहिवरून

कामठी :- कामठी रेल्वे स्टेशन येथे रेल्वे स्टेशन प्रबंधक म्हणून कार्यरत असताना नियत वयोमानानुसार निवृत्त झालो. कर्तव्यात असताना तो अधिकारी असो की कर्मचारी यांनी स्वभावात दुराग्रह बाळगू नये.कामे करावयास येणाऱ्या प्रत्येकास आपले काम निस्पृह व्हावे अशी माफक अपेक्षा असते.अशा प्रसंगी त्यांचे पारदर्शक कामे केल्यास त्यांना मानसीक हर्ष प्राप्त होतो आणि प्राप्त झालेला हा मानसीक हर्ष हा मापदंडात मोजता येत नाही.ही आयुष्यभराची शिदोरी कायम ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नेहमी समाजसेवेचे पाईक व्हावे असे उद्गार सत्कार समारंभाला उत्तर देताना सेवानिवृत्त स्टेशन प्रबंधक कार्तिक घोष यांनी काढले.

याप्रसंगी रेल्वे सल्लागार समितीचे पदाधिकारी बबलू तिवारी, सह समस्त सदस्यगण, वरिष्ठ समाजसेवक राधेश्याम हटवार, राजेश गजभिये, रेल्वे पोलीस कर्मचारी मिनू कुमार, ए के थोरात,आर के श्रेस्था,प्रीस्मा शर्मा आदी उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

नागपूर येथील हनी ट्रॅपद्वारे खंडणी वसुल करणारी टोळी गडचिरोली पोलीस दलाच्या ताब्यात..

Mon Jan 29 , 2024
  आरोपीतांमध्ये 01 पत्रकार व 01 पुरुष पोलीस अंमलदार यांचा समावेश..  गडचिरोली – दिनांक 29/01/2024 रोजी पोस्टे गडचिरोली येथील एक शासकिय कार्यालयामध्ये कार्यरत अभियंता यांनी तक्रार दिली की, दिनांक 03/01/2024 रोजी ते शासकिय कामाने नागपूर येथे गेले असता, यातील आरोपी फिर्यादीचा जुना मित्र सुशील याने हिंगणा, नागपूर येथील हॉटेल मध्ये त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करुन दिल्याने फिर्यादी तसेच दोन महिला आरोपी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com