संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी : स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील दत्तक ग्राम अभियानांतर्गत ग्रामोन्नती सेल तर्फे ग्राम घोरपड येथे आर्थिक सामावेषण विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या छायाचित्राला माल्यार्पण आणि विद्यापीठ गीताने करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य वक्ता व मार्गदर्शक रविकांत गजभिये, लिपिक, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, कामठी यांनी आर्थिक सामावेषण या विषयावर प्रकाश टाकतांना महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आर-सेटी), नागपूर यांच्या व्दारा घेण्यात येणाऱ्या कार्यक्रम व प्रशिक्षणाची विस्तृत माहिती देत उपस्थित गावकरी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिलीत. हेल्थ अवरनेस सेलचे समन्वयक डॉ. जयंत कुमार रामटेके यांनी ध्यान साधनेचे धडे उपस्थितांना दिलेत. दत्तक ग्राम अभियान व ग्रामोन्नती सेलचे समन्वयक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी गावाचा विकास हाच देशाचा विकास असून विविध शासकीय योजनांचा लाभ विद्यार्थी आणि गावकर्यांनी घ्यावा असे आव्हान केले. याप्रसंगी ग्रामोन्नती सेलचे डॉ. यशवंत मेश्राम, डॉ. निशिता अंबादे, डॉ. अजहर अबरार, डॉ. तारुण्य मुलतानी, डॉ. राजेंद्र मुंगमोडे, डॉ. शालिनी चहांदे, डॉ. राजेश पराते, डॉ. समृद्धी टापरे, डॉ. महेश जोगी, डॉ. विकास कामडी, डॉ. मंजिरी नागमोते, कुणाल कडू, आनंद वानखेडे, अमर वानखेडे व बहुसंख्येने विद्यार्थी व घोरपड गावाचे नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावीक रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे, संचालन तपण गणवीर व आभार जयश्री उके यांनी मानले.