नागपूर :- नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०६ फेस व एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०२ केस असे एकुण ०८ केससमध्ये एकुण ०९ ईसमावर कारवाई करून रू. २८,३००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच, जुगार कायद्यान्वये ०३ केसमध्ये ०४ ईसमावर कारवाई करून रु. १५,६५५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३,८१८ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रु. ५,४१,४००/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.
वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपुर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.