टग-ऑफ-वार असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्यातिल खेळाडूची राष्ट्रीय स्पर्धेत निवड

चंद्रपुर :- टग-ऑफ-वार असोसिएशन, चंद्रपूर येथील  धम्मज्योति रविंद्र रायपुरे ही तामिलनाडु राज्यातील नामाकल जिल्ह्यामधील त्रिरुचेनगोडे येथे सुरु असलेल्या राष्ट्रिय टग-ऑफ-वार स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. दिनांक २१ ते २३ जुलै २०२३ रोजी सुरु असलेल्या ३६ वी सिनिअर टग-ऑफ-वार स्पर्धेकरिता महाराष्ट्र टग-ऑफ-वार असोसिएशननी मुलींचा संघ जाहिर करण्यात आला आहे. या ३६ वी सिनिअर टग-ऑफ-वार स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात टग-ऑफ-वार असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्यातील धम्मज्योति रविंद्र रायपुरे हिची निवड झालेली आहे. विशेष म्हणजे धम्मज्योति रविंद्र रायपुरे ही चंद्रपुर जिल्ह्यातील पहिली राष्ट्रिय टग-ऑफ-वार खेळाडू होणाचा मान मिळवला या यशाबद्दल धम्मज्योति रायपुरे हिची सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. सदर खेळाडूंला प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून टग-ऑफ-वार असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्याचे सचिव प्रा .विक्की तुळशीराम, पेटकर, इखलाक पाठन व रिंकेश ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शक लाभले.

खेळाडूच्या यशाबद्दल टग ऑफ वार असोसिएशन, चंद्रपुरचे अध्यक्ष डॉ. अनिस अहमद खान, उपाध्यक्ष डॉ. विजय सोमकुंवर, डॉ. शैलेन्द्र गिरिपुंजे, टग ऑफ वार असोसिएशन, चंद्रपुरचे सचिव प्रा .विक्की तुळशीराम पेटकर, सहसचिव बंडू डोहे, कोषाध्यक्ष वर्षा घटे, सहकोषाध्यक्ष हर्षल क्षिरसागर, सल्लागार विश्वास इटनकर, राकेश ठावरी, सौरभ बोरकर, इखलाक पाठन, रिंकेश ठाकरे, रुचिता आंबेकर व शितल बोरकर यांनी यांनी सुध्दा खेळाडूचे कौतुक करून अभिनंदन केले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत २४ नागरिक सुरक्षित स्थळी मनपा शाळांत ३१२ नागरिक आश्रयास

Sat Jul 29 , 2023
चंद्रपूर :- वर्धा नदी पूर्ण भरून वाहत असल्याने तसेच इरई धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन ठराविक अंतराने काही पाणी सोडत येत असल्याने शहरात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शहरातील ३१२ नागरिकांनी मनपा शाळेत आश्रय घेतला तसेच २४ नागरिकांना मनपा आपत्ती व्यवस्थापन चमूने सुरक्षित स्थळी हलविले आहे. वडगाव मागील परिसर,जगन्नाथ बाबा नगर, ठक्कर कॉलनी परिसर, सिस्टर कॉलनी मागील परिसर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com