संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
स्लग-हॉटेलात होतोय खाद्य तेलाचा नियमबाह्य पुनर्वापर
कामठी ता प्र 22 :- बहुतांश नागरिकांचा कल हा बाहेरील पदार्थ खाण्याकडे असतो त्यातही तळलेले व चंमंचमित पदार्थाना विशेष पसंती दिली जाते.मात्र हे पदार्थ ज्या तेलात तळले जातात त्या तेलाची गुणवत्ता कधीच तपासली जात नाही . तसेच एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरता येते काय?याचीही साधी चौकशी होताना कधी दिसत नाही .वास्तविक पाहता खाद्यतेलाचा पुनर्वापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे असे असले तरी कामठी तालुक्यातील बहुतांश खाद्यपदार्थ विक्रेते या नियमाला बगल देत तेलाचा सर्रास पुनर्वापर करताना दिसतात.वास्तविकता काळसर तेलात तळलेल्या खाद्य पदार्थामुळे तसेच तेलाचा पुनर्वापर केल्यास कर्करोग, ऍसिडिटी, हृदयसबंधी आजार ,अल्झायमर , पोटाचे विकार , घशाची जळजळ व खवखव असे गंभीर आजार होण्याची शक्यता असते तेव्हा हॉटेलात जाताय तर सांभाळून…असे म्हणण्याची वेळ आली आहे.
तेलाचा पुनर्वापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे हा प्रकार रोखण्याची जवाबदारी संबंधित नगर परिषद प्रशासन तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाची असली तरी याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ खेळण्याचा प्रकार सुरू आहे.एकवेळा तळलेले तेल पुन्हा वापरात येऊ नये यासाठी शासनाने कायदा केला आहे असा पुनर्वापर केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो ..असा प्रकार कामठी तालुक्यात बिनधास्तपणे सुरू आहे यावर कारवाही होने अपेक्षित आहे. मात्र याकडे संबंधित अधिकारी लक्ष पुरवीत नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल..