मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये 7 हजार 347 उमेदवारांची निवड – विजयलक्ष्मी बिदरी

– 3 हजार 282 उमेदवार झाले रुजू

– प्रशिक्षण योजनेत ऑनलाईन सहभागी होण्याचे आवाहन

नागपूर :- विविध क्षेत्रात केवळ अनुभव नसल्यामुळे पूर्णवेळ रोजगार मिळत नाही. अशा युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही महत्त्वकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत विभागातील 7 हजार 347 युवकांची निवड करण्यात आली आहे. यापैकी 3 हजार 282 उमेदवार विविध आस्थापनांमध्ये रुजू झाले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी सुरू केलेल्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेत विभागातील 23 हजार 041 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शासकीय व खाजगी क्षेत्रात 25 हजार 857 रिक्तपदे अधिसूचित करण्यात आले आहे. युवकांनी या युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त बिदरी यांनी केले आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी 6 महिन्याचा कालावधी असून शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कालावधी 12 वी पास उमेदवारांना प्रतिमाह 6 हजार रुपये, आयटीआय अथवा पदवीकाधारकांना 8 हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येणार आहे. विभागात ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी 7 हजार 347 उमेदवारांची निवड करण्यात आली असून यामध्ये नागपूर जिल्ह्यात 1 हजार 165, वर्धा जिल्ह्यात 996, भंडारा 682, गोंदिया 1 हजार 668, चंद्रपूर 823 तर गडचिरोली जिल्ह्यातील 2 हजार 013 उमेदवारांचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज सादर केल्यापैकी आतापर्यंत विभागात 3 हजार 282 उमेदवार विविध शासकीय आस्थापनांमध्ये रुजू झाले आहे. यापैकी सर्वाधिक वर्धा जिल्ह्यात 996, चंद्रपूर 621, गोंदिया 585 गडचिरोली 501, नागपूर 386 तर भंडारा जिल्ह्यातील 183 उमेदवारांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत रिक्त असलेल्या पदामध्ये 20 हजार 717 शासकीय तर 5 हजार 140 खाजगी क्षेत्रात रिक्त जागांचा समावेश आहे. या रिक्त पदासाठी विभागातील सुशिक्षीत युवकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असेही बिदरी यांनी आवाहन केले आहे.

कौशल्य विकास विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in यावर नोकरी सादर हा टॅब ओपन हाईल. यावर त्यानुसार नोंदणी फार्म भरणे आवश्यक आहे. आपली नोंदणी यशस्वी झाल्याबाबतचा संदेश आल्यानंतर नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. नोंदणी विनामुल्य आहे. विविध खाजगी आस्थापनांने आवश्यक असलेल्या मुनष्यबळाची मागणीसुध्दा या पोर्टलवर नोंदवावी.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2024, सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्स मंडळासाठी पाच लक्ष रुपयांचे पहिले पारितोषिक

Mon Aug 19 , 2024
नवी मुंबई :- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिनांक 7 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी शासनाकडून सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी 5 लक्ष रुपयांचे पहिले पारितोषिक देण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर दि.31 ऑगस्ट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com