नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज झोन अंतर्गत थकीत मालमत्ता कर वसुली मोहिमेअंतर्गत खुल्या भुखंडांवर जप्ती/वारंट कार्यवाही करण्यात आली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार लकडगंज झोन अंतर्गत एकूण १२४ भुखंड व मालमत्ता कर रक्कम रूपये ३६,३६,०९४ रूपये थकीत कर वसुली करिता जप्ती कारवाई करण्यात आली.
बुधवार (ता. १४) रोजी करण्यात आलेली कार्यवाही लकडगंज झोनचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांच्या मार्गदर्शनात सहा. अधिक्षक रोशन अहिरे, कर निरीक्षक सुर्यकांत रेवतकर, भूषण मोटघरे, लालप्पा खान, पंकज फुटाणे, मनिष तायवाडे यांनी केली.
यात मौजा भरतवाडा, खसरा क्रमांक २८,२९, मंगलमुर्ती को ऑप. हौ. सो. नागपूर येथील भूखंड क्रमांक १५९ ते १८७, १८९ ते १९१ असे एकूण ३२ भूखंड ज्याची एकूण रक्कम २०,२२,५७५ एवढी आहे. तसेच मौजा पूनापूर खसरा क्रमांक ५१, धनलक्ष्मी गृह.नि.स. सो. येथील भूखंड क्रमांक ३३,४०, ४९, ५१, ४८, ५२, ५६,९९, १३४, १६७,१६७/ A. १६७/B,१६३ असे एकूण १३ भूखंड ज्याची एकूण रक्कम १,३४ ३५८ एवढी आहे. मौजा पूनापूर खसरा क्रमांक २७/४ एस.वी.एस. डेव्हलपर्स पार्ट महाकाळकर येथील भूखंड क्रमांक ६९,८१,८२,१४,११७,१४१,१४९ असे एकूण ०७ भूखंड ज्याची एकूण रक्कम ४७ ०८५ एवढी आहे. मौजा पूनापूर खसरा क्रमांक ७६,७६/१ दिनाबंधू भूमी विकास संस्था. येथील भूखंड क्रमांक ३२,८९,११५, ११८, १३५,१३९ असे एकूण ०६ भूखंड ज्याची एकूण रक्कम ७५,०५१ एवढी आहे मौजा पूनापूर खसरा क्रमांक २७/२ इंदिरा को. ऑप. हौ.सो. येथील भूखंड क्रमांक ४/१९,२५,२९,३५,९६,१०५,१० ६,११२,११३, १५१,१६१, १६३ असे एकूण १४ भूखंड ज्याची एकूण रक्कम १,२१,९२३ एवढी आहे.
मौजा पूनापूर खसरा क्रमांक ६५ प्रिती को. ऑप. हौ.सो येथील खुला भूखंड क्रमांक ३८ असे एकूण १ भूखंड ज्याची एकूण रक्कम २०,८७५ एवढी आहे. मौजा पूनापूर खसरा क्रमांक ४८ ४७/२ समाज सागर को. ऑप. हौ.सो. येथील भूखंड क्रमांक ४७ असे एकूण १ भूखंड ज्याची एकूण रक्कम १७,४८१ एवढी आहे. मौजा पूनापूर खसरा क्रमांक ४३, ४४/२ सुविकास गृ.नि. संस्था येथील भूखंड क्रमांक ७ असे एकूण १ भूखंड ज्याची एकूण रक्कम २०,५५५ एवढी आहे. मौजा पूनापूर खसरा क्रमांक २५ इंदिरा को. ऑप. हौ.सो. येथील भूखंड क्रमांक २३१ असे एकूण १ भूखंड ज्याची एकूण रक्कम १०,०६२ एवढी आहे. मौजा पूनापूर खसरा क्रमांक ४६, ४७/२ किर्तीघर को. ऑप.ही. सो. येथील भूखंड क्रमांक १२९ असे एकूण १ भूखंड ज्याची एकूण रक्कम १२,३६८ एवढी आहे.
मौजा पूनापूर खसरा क्रमांक ५०/२ मधु वात्सल्य को. ऑप. हौ.सो. येथील भूखंड क्रमांक ८९ असे एकूण १ भूखंड ज्याची एकूण रक्कम २८,९९४ एवढी आहे. मौजा पूनापूर खसरा क्रमांक ५०/२ दिनाबंधू भूमी विकास संस्था येथील भूखंड क्रमांक २,६७,८० असे एकूण ३ भूखंड ज्याची एकूण रक्कम ३२,५५८एवढी आहे.
मौजा भांडेवाडी खसरा क्रमांक १०१/३,४ दिनाबंधू भूमी विकास संस्था येथील भूखंड क्रमांक ५,२१,६८,७२, ७८,८०, ९५,११३.१ ३६, १४०, १४३+१४४+१४५, १५३, १५५, १५६, १८०,१८४, १८५,१९३.१ ९४,१९६,२०५,२४४ असे एकूण २२ भूखंड ज्याची एकूण रक्कम ५,46,१८९ एवढी आहे. मौजा भांडेवाडी खसरा क्रमांक ६८ किर्तीघर को. ऑप.ही. सो येथील भूखंड क्रमांक १, १४५, १५०,१५१, १८४,१८५ असे एकूण ०६ भूखंड ज्याची एकूण रक्कम १,१२,५२३ एवढी आहे. मौजा भांडेवाडी खसरा क्रमांक९२/५ सुविकास को. ऑप.ही. सो येथील भूखंड क्रमांक ४,२१,३३,२७,३ असे एकूण ५ भूखंड ज्याची एकूण रक्कम १,८८,०५६ एवढी आहे. मौजा भांडेवाडी खसरा क्रमांक ५८/,७२ सुरेख गृ.स. सं. येथील भूखंड क्रमांक ६६+६७, ८१, ४२, २३६असे एकूण ४ भूखंड ज्याची एकूण रक्कम १,२८,५०७ एवढी आहे. मौजा भांडेवाडी खसरा क्रमांक ७५ राणी सतीमाता को. ऑप. सोसायटी येथील भूखंड क्रमांक ८,१७,११,१,२,४६ असे एकूण ६ भूखंड ज्याची एकूण रक्कम १,३८,९३४ एवढी आहे. अशा एकूण १२४ भूखंडांवर ३६,३६,०९४ रूपये कर थकीत असून वसुली करिता जप्ती कारवाई करण्यात आली.
थकीत कर मालमत्ता धारकांनी वरीलप्रमाणे नमूद खुल्या भुखंडाच्या थकीत मालमत्ता कराचा ७ दिवसाचे आत भरणा करावा अन्यथा सदर भूखंडांचे लिलाव करून थकीत कर वसूल करण्यात येईल तसेच झोन मधील इतरही मालमत्ता धारकांनी थकीत मालमत्ता कर त्वरीत भरून जप्ती कार्यवाही टाळावी असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आली आहे.