जिल्ह्यात कलम 144 लागु

गडचिरोली :- भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार 12- गडचिरोली – चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदार संघ, सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता मतदान दिनांक 19 एप्रिल, 2024 रोजी व मतमोजणी दिनांक 04 जुन, 2024 रोजी आहे. सदर निवडणूक खुल्या व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया व मतमोजणी शांततेत पार पाडणे आवश्यक असल्याने सदर निवडणूक कालावधीत सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेस क्षती पोहचण्यास अथवा मानवी जिविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट उत्पन्न होण्यास अथवा प्रशांतता बिघडवण्यास अथवा दंग्यास किंवा दंगलीस प्रतिबंध करण्यासाठी या आदेशाद्वारे निर्देश देणे आवश्यक आहे असे मत झाले आहे.

जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली, संजय दैने यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन पुढील प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे.

मतदान व मतमोजणी केंद्राचे परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती (संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून) एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत. मतदान व मतमोजणी केंद्राचे परिसरात उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करता येणार नाही. मतदान व मतमोजणी केंद्राचे परिसरात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करण्यास व निषिध्द वस्तु बाळगण्यास मनाई असेल. मतदान व मतमोजणी सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करता येणार नाही. मतदान व मतमोजणी केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहिल. सदर आदेश पुढील दिनांक व कालावधी करितालागू/अंमलात राहील.

मतदान / संबंधित मतदान केंद्रावर दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7.00 ते 3.00 वा.पर्यंत, मतमोजणी / मतमोजणीचे ठिकाणी दिनांक 04 जुन 2024 रोजी सकाळी 07.00 ते निकाल घोषित करेपर्यंत आदेशाचा अंमल राहील. सदर आदेश आज दिनांक 04 एप्रिल 2024 रोजी जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांच्या सही व शिक्कानिशी निर्गमित करण्यात आले. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द कायद्यातील तरतुदीनुसार योग्य कार्यवाही करण्यात येईल. असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली संजय दैने यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीमेची केंद्रीय चमु कडून पाहणी

Sat Apr 6 , 2024
गडचिरोली :- राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची दिनांक 26 मार्च २०२४ पासून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व आरमोरी या तालुक्यात सुरु झालेली आहे. या मोहिमेचे  पर्यवेक्षण करण्याकरता केंद्रस्तरीय तांत्रिक सहाय्य युनिट, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम दिल्ली कार्यालयाचे अभिमन्यू सिन्हा व राज्यस्तरीय विभागीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण, भारत सरकार, आकुर्डी पुणे कार्यालयाचे विभागीय संचालक डॉ. अनिल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com