हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीमेची केंद्रीय चमु कडून पाहणी

गडचिरोली :- राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची दिनांक 26 मार्च २०२४ पासून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व आरमोरी या तालुक्यात सुरु झालेली आहे. या मोहिमेचे  पर्यवेक्षण करण्याकरता केंद्रस्तरीय तांत्रिक सहाय्य युनिट, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम दिल्ली कार्यालयाचे अभिमन्यू सिन्हा व राज्यस्तरीय विभागीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण, भारत सरकार, आकुर्डी पुणे कार्यालयाचे विभागीय संचालक डॉ. अनिल अलोणे यांच्या चमूणे चामोर्शी व आरमोरी तालुक्यातील विविध आरोग्य संस्थांना भेटी देऊन पाहणी केली.

प्राथमिक आरोग्य केंद्र, भेंडाळा तसेच आरोग्य संस्थेतील कार्यक्षेत्रतर्गत गावातील काही घरांना भेटी देऊन हत्तीरोगावरील औषधी त्या घरातील व्यक्तीने सेवन केली किंवा नाही याची पाहणी करून औषधी सेवन न केलेल्या व्यक्तीना समुपदेशन करून औषधी खाऊ घातली व हत्तीरोग होऊ नये म्हणून मार्गदर्शन केले.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वडधा येथे सुद्धा पाहणी केली. यादरम्यान भेट दिलेल्या गावातील ज्या व्यक्तींनी हत्तीरोग औषध उपचार घेतला नाही, त्यांना समक्ष औषधी घेण्यास मार्गदर्शन केले तसेच काही मजूर शेतीच्या कामावर गेले असल्याने अश्या व्यक्तींना रात्री जेवणानंतर औषधी देण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

एकदा हातीरोग झाला की, बरा होत नाही तेव्हा हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीमे मधील तीनही औषधी गोळ्यांचे सेवन केल्याने भविष्यात हत्तीरोग होणार नाही म्हणून औषधी खाऊ घालणारे कर्मचारी व गावातील लोकांनी समक्ष औषधी गोळ्यांचे सेवन करण्याकरता मार्गदर्शन केले. या भेटीत जिल्हा हिवताप कार्यालय गडचिरोली येथील डॉ. लोकेशकुमार कोटवार, राज्य पर्यवेक्षक लेम्बे, हत्तीरोग पथक धानोरा येथील मनोज उसेंडी, व  अशोक एडलावार, आरोग्य पर्यवेक्षक हजर होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !

Sat Apr 6 , 2024
मुंबई :- पाच टप्प्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. कारण २००४, २००९, २०१४, आणि २०१९ च्या तुलनेपेक्षा २०२४ मध्ये महिला मतदारांची संख्या वाढली आहे. २००४ मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ आणि २०१४ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com