‘सेक्रेटरी’, अपार्टमेंट मधील सगळे मतदार झाले अथवा नाही लक्ष घाला : जिल्हाधिकारी

– सोसायटीचे सचिव, नगरसेवक, तरुणांनी, लोकप्रतिनिधींनी मदत करण्याचे आवाहन

नागपूर :- आपल्या नियमित कामासोबत निवडणूक विभागाच्या कर्तव्यावर येणारा शासकीय कर्मचाऱ्याला नागपूर शहरातील अपार्टमेंटमधील नागरिकांनी योग्य सहकार्य करावे; तसेच मतदार नोंदणी करण्यासाठी अपार्टमेंटच्या सचिवांनी (सेक्रेटरी) लक्ष दयावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनी आज येथे केले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या तुलनेत ज्यांना सुशिक्षित व सुज्ञ नागरिक म्हणून बघितल्या जाते. त्या वेगवेगळ्या सदनिकांमध्ये (सोसायटीमध्ये) राहणाऱ्या नागरिकांची मतदार नोंदणी मोहिमेतील प्रतिसाद अत्यल्प असून मतदान नोंदणी करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी चांगल्या प्रतिसादाची गरज असल्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी नागपूर महानगरातील जनतेला केले आहे.

21 ऑगस्टपर्यंत विशेष मतदार नोंदणी अभियान सुरू आहे. या कालावधीमध्ये नागरिकांकडून मतदान नोंदणीचे मतदार यादीतील नोंदणीच्या दुरुस्तीचे व वगळणी इत्यादी बाबत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये राबविण्यात येत आहे. आज या संदर्भात आढावा घेतला असता नागपूर महानगरात अतिशय अल्प प्रतिसाद असल्याचे लक्षात आले आहे.

दरम्यान रजिस्टर झालेल्या सोसायटी तसेच महानगरात असणाऱ्या विविध सोसायटीतील सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्र लिहून आवाहन केले आहे की त्यांनी आपल्या सोसायटीतील प्रत्येक सदनिकेमधील रहिवासी मतदार झाला अथवा नाही याची खातरजमा करावी.

अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या सचिवांनी त्या परिसरातील आजी, माजी नगरसेवकांनी व लोकप्रतिनिधींनी या संदर्भात मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. यासाठी गृहनिर्माण सोसायटी मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.

मात्र मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी नमुना क्रमांक 6, मतदार यादीतील नाव वगळणे नमुना क्रमांक 7, मतदार यादीतील मतदान कार्ड मध्ये दुरुस्ती करणे नमुना क्रमांक 8, यासाठी विद्युत पाणी बिल आधार कार्ड बँकेचे किंवा पोस्टाचे पासबुक पासपोर्ट नोंदणीकृत भाडेकरार दहावी किंवा बारावीचे वयाचा पुरावा दर्शविणारे प्रमाणपत्र इतके संक्षिप्त कागदपत्र आवश्यक आहे, ही नोंदणी ऑनलाइन देखील करता येते निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर, तसेच वोटर सर्च हेल्पलाइन अॅप द्वारेही माहिती भरता येते. यासाठी सोसायटीच्या सचिवांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीनंतर सर्व उपविभागीय अधिकारी, निवडणूक उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवाहन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कन्झुमर नाही तर प्रोड्युसर बना - आमदार जयस्वाल

Fri Aug 18 , 2023
– पंचाळा येथील माझी माती माझा देश अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमात आमदार जयस्वाल यांचे उद्गार – पंचाळा येथे माझी माती माझा देश अभियानाचा समारोप – जिल्हाधिकाऱ्यांसह सी इ ओ ची हजेरी रामटेक :- केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट पर्यंत माझी माती माझा देश हे अभियान जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आले या अभियानाची सुरुवात रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत शितलवाडी येथून झाली तर समारोप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com