कामठी शहरात कृष्ठरुग्ण, क्षयरुग्णांची शोध मोहीम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- देश कृष्ठरोग व क्षयरोग मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येतात त्याच अनुषंगाने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामठीच्या वतीने 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधी पर्यंत संयुक्त कृष्ठरोग शोध अभियान व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे यासाठी कामठी येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी यांच्या मार्गदर्शनार्थ समस्त आशा वर्कर घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेत आहेत.

डॉ शबनम खाणुनी यांनी सांगितले की प्रधानमंत्री प्रगती योजना व राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत 2027 पर्यंत देश कृष्ठरोग व क्षयरोग मुक्त करण्याचा संकल्प घेऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे.कृष्ठरोग हा आनुवंशिक नसून हा कुणालाही होऊ शकतो .कुष्ठजंतूंचा संसर्ग हा हवेतून व बाधित रुग्णांच्या शिंकण्यातून,खोकल्यातून याचा प्रसार होतो पण रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर याचा संसर्ग होऊ शकतो. शरीरावरील न खाजणारे व दुखणारे बधिर चठठे,शरीरावरीक गाठी,कानाच्या पाळ्या जाड होणे,भुवईचे केस विरळ होणे,हातापायाला येणारी बधिता ,मुंग्या ही कृष्ठरोगाची लक्षण आहेत.

त्याचप्रमाणे क्षयरोग व कृष्ठरोग यांची तपासणी या मोहीम दरम्यान ही लक्षणे दिसल्यास त्वरित तपासून घेण्यात यावे. लवकर निदान व नियमित उपचाराने कृष्ठरोग विकृती न येता हमखास बरा होतो .आपल्या कुटुंबामध्ये एखाद्याला कृष्ठरोगाची बाधा झाली तर त्याच्या कुटुंबातील निरोगी व्यक्तींना भविष्यात कृष्ठरोगाची बाधा होऊ नये यासाठी त्या कुटुंबातील तसेच संपर्कातील सर्व व्यक्तींना कॅप्सूल औषधींची एक मात्रा त्वरित दिली जाते. कुणीही कृष्ठरोगाची बाधा झाल्यास घाबरू नये या मोहिमेसाठी घरी आलेल्या आशा वर्कर्स ना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बजेरिया में जनजागरण समिति का दीपावली स्नेह मिलन। 

Tue Nov 21 , 2023
नागपुर :- जनजागरण सेवा समिति व्दारा बजेरिया चौक स्थित (कुंडले वाडा) में दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम संपन्न हुआ, प्रथम दीप प्रज्ज्वलन भु पूर्व पार्षद संजय कुमार बालपांडे, दिपक पटेल, मुन्नालाल गौर, रमन पैगवार,पिंन्टु बागडी, अजय साहु, भोई सेना के संस्थापक अशोक त्रि गौर ने किया, अतिथियों का स्वागत खुशालचंद नायक, दिलीप भुरे,नीरज पटेल, भोला नायक, मदन गौर,बंसी गौर ने किया। […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com