नागपूर :- सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूर व सिकलसेल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नुकतेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सिकलसेलग्रस्त रुग्णांसाठी तपासणी शिबीराचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे करण्यात आले.
या शिबिरासाठी सिकलसेल असोसिएशनच्या डॉक्टर अनुराधा श्रीखंडे यांनी टेक्निकल एक्सपोर्ट म्हणून या शिबिराची जबाबदारी पार पाडली. शिबिरामध्ये डॉ.अतिष बकाने यांनी हायड्रोकॅसियुरीया औषधीसाठी ग्रामीण रुग्णालय व डागा स्त्री रुग्णालय स्तरावरील नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांना सिकलसेल रुग्णांना हायड्रोक्स युरिया औषधोपचाराचे प्रशिक्षण देण्यात आले.
या शिबीराला नागपूर शहर व ग्रामीण भागातील एकूण 135 सिकलसेल रुग्णांची डॉक्टर बकाने व डॉक्टर अरोरा यांनी व त्यांच्या एक्स्पर्ट टीम द्वारे तपासणी करून आवश्यकतेनुसार हायड्रोकसियुरीया औषध मोफत देण्यात आले. सद्यस्थितीत सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, डागा स्त्री रुग्णालय स्तरावर हैड्रोकसियुरीया औषधोपचार मोफत करण्यात येत आहे.
शिबिराच्या यशस्वीतेकरीता वैद्यकीय अधिकारी डॉ. लीना लांजेवार, फार्मसी ऑफिसर आर बी एस के टीम, सिकल सेल युनिटच्या समन्वयक प्राजक्ता चौधरी, समुपदेशक संजीवनी सातपुते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रचिती वाळके, अदिती पारधी, रमीज शेख, किरण हिंगणकर, अनिकेत पोफळे, पियर सपोर्टर याचे सहकार्य लाभले.