नागपूर :- ई.सन. 2024 मध्ये समाजवादीतून पंतप्रधान आणि आंबेडकरी जनतेला विरोधी पक्षनेता बनविण्याचा प्रयत्न केला जाईल. यावरील आयोजित कार्यक्रमात राहुल नागपाल, सोशल मीडिया बहुजन नवी दिल्ली, डॉ.विनायक तुमराम, राष्ट्रीय पुरस्कार विजेते, नागपूर, निरज पटेल, सोशल मीडिया राष्ट्रीय जनमत प्रमुख, लखनौ, आणि अँड. मेहमूद प्राचा, अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली, संबोधित करतील. या कार्यक्रमाला डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पक्षाचे (RPI) कर्नाटकचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.एस.राजेंद्र यांच्या अध्यक्षतेत रविवार, 20 नोव्हेंबर 2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, नागपूर येथे दुपारी 1.00 वाजता. समाजवादीतून पंतप्रधान आणि आंबेडकरी जनतेतून विरोधी पक्षनेता बनविण्याच्या प्रयत्नावर चार वक्त्यांनी दिलेल्या एका विषयावर त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आयोजकांनी म्हटले आहे. डॉ.मोरेश्वर नगराळे आयोजक यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा कांबळे, माधुरी मून, निर्मल भोयर, प्रशांत अगस्कंदे, जावेद पाशा कुरेशी, आणि रामभाऊ राऊत यांची उपस्थिती राहतील.