सावनेर पोलीसांनी अवैध दारू बाळगणारे आणि वाहतुक करणाऱ्या ०४ इसमावर कारवाई करून एकूण १५,५९,२६०/- रू. चा मुददेमाल जप्त केला

सावनेर :-दिनांक ०४/०६/२०२४ रोजी दारू विक्री बंद असल्याने तसेच मतमोजणी असल्याने दि. ०३/०६/२०२४ रोजी २३.०० वा. ते दिनांक ०४/०६/२०२४ रोजी से ०५.०० वाजता कोंबीग ऑपरेशन दरम्यान २३.२५ वा. दरम्यान गांधी चौक येथे एम.एच ४० सि.एच ८७६५ कर्माकाची लाल रंगाची किया गाडी संशईत रित्या मिळुन आल्याने पोलीस अधिकारी आणी अंमलदार यांनी गाडीची झडती घेतली असता किया गाडी क्रमांक एम. एच ४० सि. एच ८७६५ चे डिक्की मधून एकुण १२ बॉक्स विदेशी किंमती १,०१,५२०/-रू. चा माल मिळून आल्याने, किया गाडीचे चालक आकाश घनश्याम नारनवरे वय २४ वर्ष रा. रमाई नगर महादुला कोराडी यांचे वर नमुद गुन्हयात दारू आणी किया गाडी एकुण १५,०१५,२०/- रू चा माल अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आल्याने यातील आरोपी विरूध्द कलम ६५(अ), (ई), ८२ म.दा. का अन्वये कारवाई करून पो.स्टे सावनेर येथे अप क्र. ५४९/२४ अन्वये गुन्हा करण्यात आला आहे. तसेच दिनांक ०३/०६/२०२४ रोजी आरोपी नामे राम वासुदेव कोहाड वय ५२ वर्षे रा. धापेवाडा तह, सावनेर जि. नागपूर याचेवर अप. कमांक ५४८/२४ कलम ६५ ई म.दा.का प्रमाणे गुन्हा दाखल करून १५ लिटर किमंती १५०० रू. चा गावठी मोहाफुलाची दारू जप्त करण्यात आली, आरोपी रियाज इजाहर मंसूरी वय २८ वर्षे रा वार्ड नं १५ गजानन नगर सौंसर, तह सौंसर जि. पांडूर्णा, रोहीत सुरेश टेकाम वय २३ वर्षे रा. सिव्हील लाईन सौंसर तह. सौसर जि. पांदुर्णा यांचे विरूध्द अप कमांक ५४६/२४ कलम ६५ ई म.दा का गुन्हा दाखल करून ५३,८००/-रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आला, अप कांक ५४७/२४ कलम ६५ ई म.दाका आरोपी शुभम विजय कछवा वय २३ वर्षे रा. किल्लापुरा सावनेर याचेकडून २४४०/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक ०३/०६/२०२४ रोजी व दिनांक ०४/०६/२०२४ रोजी एकूण ०४ गुन्हे दाखल करून एकूण १,०९,२६०/-रू. ची विदेशी दारू व गावठी दारूचा मुद्देमाल आणी किया गाडी कमांक एम. एब ४० सि.एच ८७६५ व होंडा शाईन गाडी कमांक एम. एच-४९ वि एस- २०३९ किंमती १४,५०,०००/-रू. असा एकूण १५.५९,२६०/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही हर्ष पोहार पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा.), रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा),  सहा. पोलीस अधिक्षक अनिल मस्के, सावनेर विभाग नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे सावनेर येथील ठाणेदार पोनि रविन्द्र मानकर, सपोनि मंगला मोकाशे, सफी सुभाष राठोड पोहवा अतुल खोडणकर, पोहवा सुरेद्र वासनिक, पोहवा संतोष वैरागी, पोशि अंकूश मुळे, पोकों अशोक निस्ताने, पोको नितेश परखड, पोकों सचिन लोणारे यांनी केली असुन गुन्हयाचा तपास सपोनी सुरेन्द्र वासनिक हे करत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामगढ येथे आजाराने ग्रस्त विवाहित तरुणीचा आकस्मिक मृत्यू

Thu Jun 6 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामगढ रहीवासी आजाराने ग्रस्त 24 वर्षीय विवाहित तरुणीचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना आज पहाटे साडे चार दरम्यान निदर्शनास आली असून मृतक तरुणीचे नाव मुस्कान सरोज खान असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक ही विवाहित असून काही महिन्यांपासून पतीपासून वेगळे राहत माहेरी मंडळीसह वास्तव्य करीत आहे.तसेच आजाराने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com