संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठीता प्र 31 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा स्थित शेख बुनकर कॉलोनी स्थित असगर किराणा दुकानातून अज्ञात चोरट्यानी दुकानाच्या छतावरून अवैधरित्या प्रवेश करून दुकानातील स्टीलच्या डब्बयात ठेवलेले 30 हजार रुपये चोरून नेल्याची घटना आज सकाळी सहा दरम्यान घडून आली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी शाहिद अलि असगर अली उमर वय 41 वर्षे रा शेख बुनकर कॉलोनी कामठी ने स्थानिक पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 457, 380 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.