रामगढ येथे आजाराने ग्रस्त विवाहित तरुणीचा आकस्मिक मृत्यू

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामगढ रहीवासी आजाराने ग्रस्त 24 वर्षीय विवाहित तरुणीचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना आज पहाटे साडे चार दरम्यान निदर्शनास आली असून मृतक तरुणीचे नाव मुस्कान सरोज खान असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक ही विवाहित असून काही महिन्यांपासून पतीपासून वेगळे राहत माहेरी मंडळीसह वास्तव्य करीत आहे.तसेच आजाराने ग्रस्त असल्याने औषधोपचार सुरू होता. काल रात्री घरमंडळी तील आई ,दोन भाऊ,एक बहीण निवांत झोपले असता पहाटे पाच वाजता उठले असता सदर मृतक महिला मृतावस्थेत आढळल्याने सर्वांनी दुःखाचा एकच हंबरडा फोडला मात्र हा आकस्मिक मृत्यू नसून घराला दार नसल्याने कुणीतरी संशयिताने घरात शिरून गळा आवरून जीव घेतला असावा असा आरोप मृतकेचे घरमंडळी करीत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदनगृहात शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतकेच्या घरमंडळीच्या आरोपाची दखल घेत शवविच्छेदन अहवाला नंतर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.मात्र कुठलाही घातपात झाला नसून आजाराने आकस्मिक मृत्यु झाला आहे असे मत पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कांद्रीत मादी बिबट आढळुन आल्याने खळबळ

Thu Jun 6 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Video-2024-11-13-at-13.36.19_a6cf01ac.mp4 कन्हान :- वेकोलि कामठी खुली कोळसा खदान ने कांद्री वार्ड क्र. २ च्या लोकवस्ती जवळील नाल्यालगत ओबी माती डम्पींग केली आहे. त्याच नाल्याजवळ सकाळच्या सुमारास मादी बिबट आढळुन आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असुन नागरिका मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभाग व पोलीस विभागाचे पाचारण करण्यात आले होते. प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.४) मे ला सकाळच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com