नागपूर :- भारताच्या दक्षिणेकडील एक टोक असलेल्या कन्याकुमारीहुन 26 जानेवारी रोजी निघालेला संविधान जागृती रथ आज सायंकाळी दीक्षाभूमी येथे पोहोचला. त्या संविधान रथाचे व आयोजक असलेल्या मुकेश सरकार यांचे नागपुरातील दीक्षाभूमी च्या मुख्य प्रवेश द्वारावर भव्य स्वागत झाले.
नागपूरकरांच्या वतीने उत्तम शेवडे ह्यांनी, बहुजन समाज पार्टीच्या वतीने संदीप मेश्राम व राहुल सोनटक्के ह्यांनी दीक्षाभूमीच्या वतीने शरद मेश्राम व सिद्धार्थ म्हैसकर ह्यांनी, सीनियर सिटीझन च्या वतीने रामभाऊ बागडे ह्यांनी, डॉक्टर आंबेडकर लॉयर्स असोसिएशन च्या वतीने ऍड सुरेश घाटे ह्यांनी तर कर्मचारी संघटनांच्या वतीने हिरालाल राऊत आदींनी भव्य स्वागत केले.
आयोजकांनी दीक्षाभूमीवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व बाबासाहेब आंबेडकर स्मारका मधील अस्थिकलशाला अभिवादन केले. बुद्ध वंदना घेतल्यावर दीक्षाभूमीवरील संविधान रथयात्रेचा समारोप झाला.
रथयात्रेच्या समारोप प्रसंगी दिल्लीचे मुकेश सरकार, मुंबईचे शूद्र शिवशंकर यादव, जोधपूरचे मनोज कुमार ह्यांनी संविधान जागृती रथामागील आपली भूमिका कथन करताना “संविधान है तो हम है, हम है तो देश है, इसलिये संविधान को और बाबासाहेब के मुव्हमेंट को संघटित रूप से बचाना सबसे जरुरी है” असे ते म्हणाले.
स्वागत करणाऱ्यात प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के शरद मेश्राम, सिद्धार्थ म्हैसकर, रामभाऊ बागडे, रमेश देशभ्रतार, वीरेंद्र कापसे, प्रतिभा मडामे, हिरालाल राऊत, जितेंद्र पाटील, तुषार सोमकुवर, प्रवीण पाटील, सुनील पाटील ह्यांच्या सहित मोठ्या संख्येने विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
ही संविधान जागृती रथयात्रा 10 राज्यात फिरणार असून 15 मार्च रोजी बहुजन नायक कांशीरामजींच्या जयंती निमित्ताने नागपुरात होणाऱ्या जयंती समारोहात कांशीरामजींच्या अस्थीं कलशाला अभिवादन करून ते मध्य प्रदेशाकडे रवाना होणार आहेत. 14 एप्रिल रोजी दिल्लीतील बोट क्लबवर या संविधान रथयात्रेचा समारोप होणार आहे.