बोरी सिंगारदीप येथे पाणी साठवीणारी नव्हे हलनारी टाकी – सरपंच दिलीप इंगोले

– तीन वर्षापूर्वीपासून पाण्याची टाकी बनली शोभेची वस्तु.

कोदामेंढी :- मौदा तालुक्यातील सीमेलगत पारशिवनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गट ग्रा. पं. बोरिसिंगदीप अंतर्गत येणाऱ्या बोरी गावातील नागरिकांना नळयोजनच्या माध्यमातून पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याची टाकी तीन वर्षापूर्वी बनविण्यात आली, परंतु या टाकीवर चढन्यासाठी बनविण्यात येणाऱ्या शिढ़या या चढ़ताना हालत असल्याचे अडीच वर्षापूर्वी निवडून आल्यानंतर कळले. माझ्या पूर्वीच्या सरपंचाच्या कार्यकाळात बोरी गावात पाणी साठविणारी नव्हे तर हलनारी टाकी बनल्याने तीन वर्षापूर्वीपासून पाण्याची टाकी शोभेची वस्तु बनल्याचे बोरी सिंगारदीप चे सरपंच दिलीप इंगोले यांनी सांगितले.

सध्या मौदा तालुक्यातच नव्हे तर जिल्हा, राज्य व देशात जलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावागावात नळ योजनचे कामे सुरु आहेत, त्या अंतर्गत काही गावानमधे पाण्याच्या टाक्या बनाविण्याचे काम प्रगतिपथावार आहे. मौदा तालुक्यातील गावानमधे सध्या बनणाऱ्या पाण्याच्या टाक्या या हलणाऱ्या नव्हे तर, पाणी साठवीणाऱ्याच बनाव्या, अशी मागणी मौदा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सह सुध्न्य जनतेने केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

१८ ते १९ मे दरम्यान श्री शनी जयंती महोत्सवाचे आयोजन

Mon May 15 , 2023
– कार्यक्रमात पार पडणार विविध धार्मिक कार्यक्रम रामटेक :- रामटेक ते मौदा मार्गावर किट्स कॉलेज जवळ असलेल्या शनी मंदीरात श्री शनी जयंती महोत्सव निमित्ताने शनी मंदिर सेवा समीतीच्या वतीने येत्या १८ व १९ मे दरम्यान दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तेव्हा भावीक भक्तगणांनी तन मन धनाने सेवा समपिँत करून या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहण श्री शनी मंदिर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com