– (स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई)
नागपूर :-पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत येणाऱ्या सिरसोली परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार विशाल नरबद कनोजे, वय ४२ वर्ष, रा. सिरसोली हा मागील ०३ वर्षापासून अरोली परिसरात गुंडगिरी करून नागरिकांना त्रास देत होता. तो नेहमी गुन्हेगारी कृत्यात गुंतलेला असायचा अरोली परिसरात मोहाफुलाची हातभट्टीने दारू काढुन विक्री करण्याच्या सवयीचा आहे. त्याच्या असामाजिक कृत्याची माहीती पोलीसांना देणान्या लोकांमध्ये तो भय निर्माण करून दहशत पसरवित असतो. नागपूर ग्रामीण पोलीसांना त्यावेविरुध्द जेव्हा जेवा तक्रारी प्राप्त झाल्या त्या त्या वेळी गंभीर दखल घेवून त्याचेविरुध्द गुन्हे नोंद केले. परंतु विशाल याचे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सुधारणा झाली नाही, त्याचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी त्याचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु विशाल याने आपली गुन्हेगारी गतिबिधी निरंतर सुरुच ठेवली. विशाल याचे कृत्य सामाजिक वाला वाक उरत असल्याने नागपूर ग्रामीणचे पोलीस अभीक्षक श्री हर्ष ए. पोहार यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण कडुन MPDA कायदयान्वये कार्यवाही करण्यात आली. दि. २३/११/२०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांनी सराईत गुन्हेगार विशाल नरबद कनोजे याचे विरुद्ध स्थानबध्दता आदेश काढला त्यानुसार त्याला मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे वर्षाकरीता स्थानबध्द केले..
सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, हर्ष ए पोदार, व अपर पोलीस अधीक्षक, डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग तथा सहायक पोलीस अधिक्षक आशित कावळे स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक झुलेकर ठाणेदार पोलीस स्टेशन अरोली तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील सुरज परमार, निलेश बर्वे, होमेश्वर बाईलकर यांनी पार पाडली.