राजधानीत संत जगनाडे महाराज जयंती साजरी

नवी दिल्ली :- संत जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात वर्धा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार व डॉ. प्रतिमा गेडाम उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थ‍ितांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

यावेळी खासदार रामदास तडस यांनी संत जगनाडे महाराजांबद्दल आपले विचार मांडले. ते म्हणाले की, संत जगनाडे महाराज हे एक महान संत होते.त्यांचे विचार आणि कार्य आजही समाजाला प्रेरणा देतात .

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी संत जगनाडे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

New entrepreneurs to get variety of information under one roof at startup Expo - Skill development Minister MangalPrabhat Lodha

Fri Dec 8 , 2023
– Startup Expo organised at the Namo Maha Rozgar festival coming up at Nagpur Mumbai :- The skill, employment, Entrepreneurship and innovation department had organised the Namo Maha Rozgar festival Startup Expo_ on 9th and 10th of December at Jamunalal Bajaj administrative building, Nagpur University, Nagpur road. It will start at 10 a.m. and last till 7 p.m. The Minister […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!