संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांची सावली – खासदार रामदास तडस                    

नवी दिल्ली :-  संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराज यांची सावली असल्याचे प्रतिपादन वर्धा मतदान संघाचे खासदार रामदास तडस यांनी केले.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त आज आयोजित कार्यक्रमात खासदार रामदास तडस बोलत होते. याप्रसंगी राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित होते. खासदार तडस यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थ‍ितांनी प्रतिमेस पुष्प अर्पण आदरांजली वाहिली.

संत तुकाराम महाराजांचे सर्वच अभंग मुखोद्गत होते. त्यांनी या अभंगाचे पुनर्लेखन केले. लोकोउपयोग आणि परमार्थ कसा करावा यासंदर्भातील काही अभंग त्यांनी स्वत: लिहिले असल्याचे तडस यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेरोजगारांनो, फसवणुकीपासून सावधान !

Thu Dec 8 , 2022
नागपूर :- कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या प्रधान सचिव, आयुक्त, उपायुक्त व सहायक आयुक्त यांच्या खोट्या स्वाक्षरीच्या आधारे बेराजगार उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भविष्यात अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी बेरोजगारांनी सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.ग. हरडे यांनी केले आहे. नुकताच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com