नागपूर :- महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, कवी, समाजसुधारक व राष्ट्रीय उत्थानाची सतेज भावना असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तहसिलदार महेश सावंत आणि एन.एम. ठाकरे, विभागीय माहिती केंद्राचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार, नायब तहसिलदार सर्वश्री आर.के. डिघोळे, नितीन डोईफोडे, टि.आर.कावडकर, रेवती कारखानीस यांच्यासह उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.