संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 7:- येथील समाजकार्य महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी होत्या. प्रमुख मार्गदर्शन म्हणून प्रा. डॉ. प्रणाली पाटील, प्रा. उज्ज्वला सुखदेवे, प्रा. डॉ. राष्ट्रपाल मेश्राम मंचावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉ. प्रणाली पाटील यांच्या नेतृत्वात बुद्ध वंदना घेण्यात आली. या प्रसंगी प्रा.डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी प्रास्ताविक भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा आढावा घेतला. यानंतर प्रमुख मार्गदर्शक प्रा .डॉ. प्रणाली पाटील व प्रा. उज्ज्वला सुखदेवे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट विद्यार्थ्यांपुढे मांडला. डॉ. आंबेडकरांची सामाजिक चळवळ, भारतीय संविधान, हिंदू कोड बिल व धम्मचक्रप्रवर्तन या ठळक घटनांवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात डॉ रुबीना अन्सारी यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या परिश्रमांचा आढावा घेऊन सर्वांना संविधानातील अधिकार व हक्क व कर्तव्याच्या परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रीती मेश्राम या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रणाली वाटकर या विद्यार्थिनीने मानले.
कार्यक्रमाला डॉ. ओमप्रकाश कश्यप, डॉ. मनोज होले, डॉ. सविता चिवंडे, डॉ. निशांत माटे, प्रा. शशिकांत डांगे, डॉ. मनीष मुडे, डॉ. हर्षल गजभिये, प्रा.राहुल जुनगरी, प्रा. राम बुटके, प्रा. गिरीश आत्राम, प्रा. आवेशखरणी शेख, प्रफुल बागडे,प्रतीक कोकोडे, किरण गजभिये, वसंता तांबडे,नीरज वालदे, शशील बोरकर, राहुल पाटील तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.