नवी दिल्ली येथे बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मयतांची नावे अजूनही मतदार यादीत कायमच! - प्रा. प्रमोद चहांदे 

Mon Feb 20 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- मतदार नोंदणी ही शासनाची वर्षभर निरंतर चालणारी कार्यालयीन प्रक्रिया असताना याच मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याचे लक्षात येत आहे. नुकतेच कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून नगर परिषद निवडणुका लागण्याच्या तोंडावर आहेत मात्र मतदार यादीत कित्येक मयतांची नावे अजूनही तसेच कायम आहेत तेव्हा या मयत मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com