अखिल भारतीय आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा महिला व पुरुष संघ घोषित

भुवनेश्वर येथे 26 डिसेंबरपासून स्पर्धेचे आयोजन

अमरावती :- अखिल भारतीय आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेचे भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिटूट ऑफ सोशल सायन्स येथे दिनांक 26 ते 29 डिसेंबर, 2022 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा महिला व पुरुष संघ घोषित झाला असून या दोन्ही खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर दिनांक 12 ते 21 डिसेंबर, 2022 दरम्यान डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे होणार आहे.

पुरुष खेळाडू (जलतरण)

पुरुष खेळाडूंमध्ये श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीाचा युवराजसिंह ठाकूर, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा अनिरुध्द गुप्ता, अथर्व हिंगमिरे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा पार्थ हिवसे, प्रथमेश घोम, चर्वाक भोंडे व लवकेश उदापूरकर,विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीचा अमर आखरे, सय्यद शाहीद, महात्मा फुले महाविद्यालय, अमरावतीचा देवांग व्यवहारे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीचा राज उमाटे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा वेदांत सराफ व सुमित मोहोड, सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीचा आलोक देशमुख, वेदांत चंदनबटवे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा पार्थ अंबुलकर, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोलाचा पौष्ण जोग, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किरणनगर अमरावतीचा अथर्व वावरकर याची निवड करण्यात आली आहे.

महिला खेळाडू (जलतरण)

श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीची वैभवी थेटे, कस्तुरी पिंजरकर व निशा बोंडे, ब्राजलाल बियाणी महाविद्यालय, अमरावतीची आर्या साखरकर व वंशिका सप्रिया, सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अमरावतीची रिया हिंडोचा व मंजुषा बनसोड, प्रो.आर.एम.आय.टी.आर., अमरावतीची जानकी देशमुख व इशिका तवर, डी.सी.पी.ई., अमरावतीची बिरिना लशीराम व सुवेच्छा शर्मा, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीची पुर्वा येदमकर हिची निवड करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

Tue Nov 8 , 2022
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.7) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!