पणजी :-राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नौकानयनमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू तीन गटांमध्ये अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे बुधवारी ही पदके निश्चित झाली आहेत.
महाराष्ट्राचा ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळने पुरुषांच्या सिंगल स्कल विभागात अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. त्याच्यापुढे आशिष फोगट (उत्तराखंड), करमजीत सिंग (पंजाब) आणि बलराज पन्वर (सेनादल) यांचे आव्हान आहे.
दुहेरीमध्ये मितेश गिल व अजय त्यागी यांनी अंतिम फेरीत यापूर्वी स्थान मिळवले आहे. त्यांच्यापुढे मध्य प्रदेश, दिल्ली व सेनादलाच्या खेळाडूंचे आव्हान असणार आहे. कॉक्स फोर विभागात महाराष्ट्राला पदक मिळवण्यासाठी मध्य प्रदेश, दिल्ली व सेनादल यांच्याविरुद्ध चिवट लढत द्यावी लागणार आहे.