कोल्हापूर येथे रन फॉर वोट ‘लोकशाही मॅरेथॉन’चे 7 एप्रिल रोजी आयोजन

– QR कोड स्कैन करा आणि मॅरेथॉन मधे सहभागी व्हा

– “चला धावू या – सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करूया बळकट लोकशाहीसाठी”

कोल्हापूर :- सार्वत्रिक लोकसभा निवडणुक सन 2024 साठी मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने रविवार, दि.7 एप्रिल 2024 रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचेतर्फे स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) अंतर्गत “RUN FOR VOTE” या “लोकशाही मॅरॅथॉन” चे आयोजन करणेत आले आहे. “चला धावू या – सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करूया बळकट लोकशाहीसाठी” हे या लोकशाही मॅरॅथॉनचे ब्रीद वाक्य असणार आहे. कोल्हापूर शहरामधील मतदारांनी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांची जन जागृती, करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.7/4/2024 रोजी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे लोकशाही मॅरॅथॉन होणार आहे.

या लोकशाही मॅरॅथॉनमध्ये सहभागी होणा-या धावपटूंना 3 कि.मी., 5 कि.मी., 10. कि.मी. अंतराचे पर्याय उपलब्ध होणार असून या मॅरॅथॉनची सुरुवात व सांगता पोलिस परेड ग्राऊंड, कसबा बावडा, कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे. या वोट मॅरॅथॉनमध्ये कोल्हापूर शहरातील विविध शासकीय, निम शासकीय, महामंडळे, राष्ट्रियीकृत बँका व सहकारी बँका, संस्था कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, मतदार नागरिक यांनी मोठ्या संख्येने उत्सफूर्तपणे सहभागी व्हावे तसेच, जे मतदार सहभागी होऊ शकणार नाहीत त्यांनीदेखील धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

या लोकशाही मॅरॅथॉनमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे गुगल फॉर्म उपलब्ध करुन दिलेला असून दि.24/3/2024 ते 31/3/2024 या कालावधीमध्ये https://forms.gle/ZjEeU27NYRwoVQ6J9 या लिंकवरती धावपटू नि:शुल्क नोंदणी करु शकतील असे आवाहन निलकंठ करे, नोडल अधिकारी (स्वीप) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांनी केले आहे.

त्याच दिवशी अशी मॅरेथॉन इचलकरंजी गडहिंग्लज गारगोटी पन्हाळा व राधानगरी येथे देखील आयोजित करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निवडणूकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना करा - डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

Tue Mar 26 , 2024
पुणे :- महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वयाद्वारे निवडणुकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि निवडणुका मुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठीचे नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित पुणे विभागाच्या निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस विशेष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com